कोलकाता, आयपीएल 2019 : कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज इडन गार्डनवर आयपीएल सामना रंगत आहे. कोलकाताने सहा सामन्यात 4 विजय मिळवते आहेत, तर दिल्लीलला 3 विजय मिळवता आले आहेत. मात्र, दिल्लीने घरच्या मैदानावर कोलकाताचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला आहे. त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी कोलकाता सज्ज झाला आहे. या सामन्यात कोलकाताचा संघ असे दोन योद्धे मैदानावर उतरवले आहेत की ज्यांनी एकाच सामन्यात शतक व हॅटट्रिक नोंदवण्याचा विक्रम नावावर केला आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून यजमान कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. इंग्लंडचा 33 वर्षीय अष्टपैलू खेळाडू जो डेन्लीने या सामन्यात कोलकातासाठी ओपनिंग केली. मात्र, त्याला पहिल्याच चेंडूवर इशांत शर्माने त्रिफळाचीत केले. पण या सामन्यात मैदानावर उतरण्यापूर्वी डेन्लीच्या नावाची हवा होती. त्याने 2018 मध्ये केंट क्लबचे प्रतिनिधित्व करताना सरेविरुद्ध ट्वेंटी-20 सामन्यात शतक व हॅटट्रिकची नोंद केली होती. त्याला फलंदाजीत अपयश आले असले तरी गोलंदाजीत त्याला आपली छाप पाडण्याची संधी आहे.
असाच विक्रम आंद्रे रसेलने केला आहे. जमैका थलाव्हासचे प्रतिनिधित्व करताना रसेलने 2018 साली त्रिंबागो नाइट रायडर्सविरुद्ध डबल धमाका केला होता. आयपीएल पदार्पणात गोल्डन डकवर बाद होणारा डेन्ली हा पाचवा फलंदाज ठरला यापूर्वी, जेसन होल्डर, सुनील नरीन, मनोज तिवारी आणि अरिंदम घोष यांना पहिल्याच चेंडूवर माघारी परतावे लागले होते.