Join us  

IPL 2019 KKR vs RCB update : अटीतटीच्या लढतीत बंगळुरूचा कोलकातावर 10 धावांनी विजय

कोलकाता, आयपीएल 2019  : अटीतटीच्या लढतीत बंगळुरूचा कोलकातावर 10 धावांनी विजय मिळवला आहे. मोइन अली आणि विराट कोहली यांच्या जोरदार ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 7:10 PM

Open in App

19 Apr, 19 11:53 PM

बंगळुरूनं मिळवला यंदाच्या सत्रातील दुसरा विजय, कोलकातावर केली 10 धावांनी मात



 

19 Apr, 19 11:23 PM

33 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 2 षटकारांसह नितीश राणाचं अर्धशतक



 

19 Apr, 19 11:17 PM

राणानं मारला षटकार, कोलकाताला विजयासाठी 83 धावांची गरज



 

19 Apr, 19 11:14 PM

रसेलनं लगावले लागोपाठ तीन षटकार, कोलकाताला विजयासाठी 93 धावांची गरज



 

19 Apr, 19 10:55 PM

युजवेंद्र चहलने कोलकाताच्या नितीश राणाला दोन जीवदान दिले. आधी स्वतःच्याच षटकात धावबाद करण्याची संधी गमावली, तर स्टॉइनिसच्या गोलंदाजीवर झेल सोडला. 
 

19 Apr, 19 10:45 PM

कोलकाताच्या धावगतीला लगाम लावण्यात बंगळुरूच्या गोलंदाजांना यश मिळाले. नवव्या षटकात कोलकाताने अर्धशतक पूर्ण केले. कोलकाताच्या दहा षटकांत 3 बाद 60 धावा केल्या. 
 

19 Apr, 19 10:37 PM

कॅच घेताना विराट कोहली अडखळला, पाहा व्हिडीओ...

https://www.iplt20.com/video/173956/virat-s-juggling-catch

19 Apr, 19 10:19 PM

 स्टेनने तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शुबमन गिलला (9) कर्णधार कोहलीकरवी झेलबाद करून तंबूत पाठवले. 

19 Apr, 19 10:16 PM



 

19 Apr, 19 10:16 PM

चौथ्या षटकात नवदीन सैनीने कोलकाताला आणखी एक धक्का दिला. त्याने सुनील नरीनला ( 18) बाद केले. 
 

19 Apr, 19 09:59 PM

डेल स्टेनच्या पहिल्याच चेंडूवर मार्कस स्टॉइनिसने कोलकाताच्या ख्रिस लीनचा झेल सोडला, पण स्टेनने षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याला माघारी पाठवले.

19 Apr, 19 09:43 PM



 

19 Apr, 19 09:38 PM

बंगळुरूने 14 ते 19 या षटकांत एक विकेट गमावत 100 धावा चोपल्या. कोहलीने 57 चेंडूंत शतक पूर्ण केले. 
 

19 Apr, 19 09:19 PM

कुलदीपने चार षटकांत 59 धावा दिल्या. आयपीएलमध्ये फिरकीपटूने दिलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या. इम्रान ताहीरने 2016मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 59 धावा दिल्या होत्या.

19 Apr, 19 09:17 PM

मोइन अलीनं आयपीएलमध्ये पाचवे जलद अर्धशतक झळकावले. या विक्रमात रिषभ पंत ( 17) आघाडीवर आहे.

19 Apr, 19 09:15 PM

पुढच्याच षटकात अलीनेही अर्धशतक पूर्ण केले. त्याने 24 चेंडूंत ही अर्धशतकी खेळी केली. त्याने कुलदीप यादवने टाकलेल्या 16व्या षटकात 27 धावा चोपल्या, परंतु त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर तो बाद झाला. 

19 Apr, 19 09:09 PM

कोहलीचे हे आयपीएलमधील 37वे अर्धशतक ठरले. त्याने यासह गौतम गंभीर व सुरेश रैना यांच्या प्रत्येकी 36 अर्धशतकांचा विक्रम मोडला.  

19 Apr, 19 09:08 PM

विराट कोहलीचे आयपीएलमधील 37वे अर्धशतक

19 Apr, 19 09:07 PM

मोइन अलीने खेळपट्टीवर स्थिरस्थावर होण्यासाठी फार वेळ न घेता फटकेबाजी सुरू केली. या फटकेबाजीमुळे कोहली व अली यांनी 21 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. कोहलीने 40 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यात 4 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता. 

19 Apr, 19 08:51 PM

आंद्रे रसेलने कोलकाता नाइट रायडर्सकडून विकेट्सचे अर्धशतक पूर्ण केले



 

19 Apr, 19 08:46 PM

नाथ आणि कोहली ही जोडी बंगळुरूला सावरेल असे वाटले होते, परंतु 9 व्या षटकात आंद्रे रसेलने त्यांना धक्का दिला. रसेलने 13 धावा करणाऱ्या नाथला बाद केले. यासह त्याने कोलकाता नाइट रायडर्सकडून 50 विकेट घेण्याचा विक्रम नावावर केला. 



 

19 Apr, 19 08:43 PM



 

19 Apr, 19 08:30 PM

अक्षदीप नाथला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. त्याच्यासोबत कोहलीनं पॉवर प्लेमध्ये 1 बाद 42 धावा केल्या.

19 Apr, 19 08:20 PM



 

19 Apr, 19 08:19 PM

सावध सुरुवातीनंतर बंगळुरूला पहिला धक्का बसला. सलामीवीर पार्थिव पटेल 11 धावांवर बाद झाला. सुनील नरीनने त्याला नितीश राणाकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. नरीनच्या आधीच्या षटकात विराट कोहली विरोधात पायचीतची अपील करण्यात आली होती. त्यासाठी कोलकाताने DRSही घेतला, परंतु सुदैवाने कोहली बचावला. 

19 Apr, 19 08:17 PM



 

19 Apr, 19 08:15 PM



 

19 Apr, 19 08:13 PM

सुनील नरीनने बंगळुरूविरुद्ध 21.26च्या सरासरीनं 15 विकेट घेतल्या आहेत. 
 

19 Apr, 19 08:08 PM

कोलकाता नाइट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या मागील पाचही सामने जिंकले आहेत. 2016 मध्ये त्यांना बंगळुरूकडून इडन गार्डनवर अखेरचा पराभव पत्करावा लागला होता. 
 

19 Apr, 19 07:59 PM

डिव्हिलियर्सच्या न खेळण्यामागचं कारण, पाहा व्हिडीओ...



 

19 Apr, 19 07:41 PM

19 Apr, 19 07:41 PM

19 Apr, 19 07:39 PM



 

19 Apr, 19 07:39 PM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : पार्थिव पटेल, विराट कोहली, मोइन अली, मार्कस स्टॉइनिस, हेन्रीच क्लासेन, अक्षदीप नाथ, पवन नेगी, डेल स्टेन, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी

19 Apr, 19 07:37 PM

कोलकाता नाइट रायडर्स : ख्रिस लीन, सुनील नरीन, नितीश राणा, रॉबीन उथप्पा, दिनेश कार्तिक, शुबमन गिल, आंद्रे रसेल, पियूष चावला, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, हॅरी गर्नी 

19 Apr, 19 07:33 PM

एबी डिव्हिलियर्स संघात नाही. हेन्री क्लासेन आणि डेल स्टेन यांचा समावेश
 

19 Apr, 19 07:32 PM

आंद्रे रसेल मैदानात उतरणार... कोलकाताच्या संघात बदल नाही

19 Apr, 19 07:27 PM



 

19 Apr, 19 07:16 PM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ इडन गार्डनवर दाखल



 

19 Apr, 19 07:14 PM

डेल स्टेन या सामन्यासाठी उपलब्ध आहे. त्याच्या समावेशाने बंगळुरूच्या गोलंदाजीची धार तीव्र झाली आहे. 

19 Apr, 19 07:13 PM

एबी डिव्हिलियर्स आजच्या सामन्याला मुकण्याची शक्यता. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर चेंडू डिव्हिलियर्सच्या हेल्मेटवर आदळला होता. त्यामुळे तो आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याची चर्चा आहे. बंगळुरूला हा मोठा धक्का म्हणावा लागेल. 

टॅग्स :आयपीएल 2019कोलकाता नाईट रायडर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर