कोलकाता, आयपीएल 2019 : मोइन आली (66) आणि विराट कोहलीच्या (100) फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुक्रवारी आयपीएलच्या 12व्या हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली. बंगळुरूने विजयासाठी ठेवलेल्या 214 धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाता नाइट रायडर्सला 5 बाद 203 धावांपर्यंतच मजल मारता आले. नितीश राणा (85* ) आणि आंद्रे रसेल (65 ) यांचा संघर्ष अपयशी ठरला.
मोइन अली आणि विराट कोहली यांच्या जोरदार आतषबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुक्रवारी खेळलेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध 4 बाद 213 धावा चोपल्या. अली व कोहली यांनी अर्धशतकी भागीदारी करताना तिसऱ्या विकेटसाठी झटपट 90 धावांची भागीदारी केली. अलीने 28 चेंडूंत 5 चौकार व 6 षटकार खेचून 66 धावा केल्या. कोहलीनेही 58 चेंडूंत 100 धावा केल्या. त्यात 9चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. आयपीएलमधील कोहलीचे हे पाचवे शतक ठरले.
डेल स्टेनच्या पहिल्याच चेंडूवर मार्कस स्टॉइनिसने कोलकाताच्या ख्रिस लीनचा झेल सोडला, पण स्टेनने षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याला माघारी पाठवले. त्यानंतर चौथ्या षटकात नवदीन सैनीने कोलकाताला आणखी एक धक्का दिला. त्याने सुनील नरीनला ( 18) बाद केले. स्टेनने तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शुबमन गिलला (9) कर्णधार कोहलीकरवी झेलबाद करून तंबूत पाठवले. कोलकाताला 6 षटकांत 3 बाद 37 धावा करता आल्या. कोलकाताच्या धावगतीला लगाम लावण्यात बंगळुरूच्या गोलंदाजांना यश मिळाले. नवव्या षटकात कोलकाताने अर्धशतक पूर्ण केले. कोलकाताच्या दहा षटकांत 3 बाद 60 धावा केल्या. रॉबीन उथप्पा फार काही करू शकला नाही. त्याच्या संथ खेळीने धावा आणि चेंडू यांतील अंतर वाढवले. नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनी फटकेबाजी केली. राणाने अर्धशतक झळकावले. रसेलनेहे फटकेबाजी केली,परंतु तो कोलकाताला विजय मिळवून देऊ शकला नाही. रसेलने 25 चेंडूंत 9 षटकार आणि दोन चौकार खेचत 65 धावा कुटल्या. ऱाणा 46 चेंडूंत 85 धावांवर नाबाद राहिला.
Web Title: IPL 2019 KKR vs RCB: rcb win by 10 runs to register their second win of the season.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.