कोलकाता, आयपीएल 2019 : कोलकाता नाइट रायडर्सने शुक्रवारी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा पराभव करून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. शुबमन गिलने यजमान किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. ख्रिस लीन आणि गिल यांनी कोलकाता नाईट रायडर्सला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर आंद्रे रसेलच्या साथीनं गिलने कोलकाताला विजयाच्या समीप आणले. लीन आणि गिलने पहिल्या विकेटसाठी 62 धावा केल्या, तर गिल व रसेल यांनी 50 धावांची भागीदारी केली. या महत्त्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर कोलकाताने शुक्रवारी 7 विकेट राखून विजय मिळवला. शुबमनने 49 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारासह नाबाद 65 धावा केल्या. कर्णधार दिनेश कार्तिकने 9 चेंडूंत नाबाद 21 धावांची खेळी केली. पंजाबचे 184 धावांचे लक्ष्य कोलकाताने 2 षटकं राखून पार केले.
या विजयानंतर कोलकाताच्या खेळाडूंनी जल्लोष केला. या सामन्यात रसेलची बॅट नेहमीप्रमाणे तळपली नसली तरी सामन्यानंतर त्यानं KKRचा स्टेज गाजवला. वेस्ट इंडिजचे खेळाडू हे त्यांच्या मनमोकळ्या स्वभावामुळे ओळखले जातात. त्यामुळे त्यांना फार क्वचितच तणावात कोणी पाहीले असेल. KKRच्या विजयानंतर रसेलने चक्क बॉलिवूड गाणं गायलं आणि सहकाऱ्यांना त्यावर ठेका धरायला भाग पाडले. आपल्या तुफान फटकेबाजीनं रसेलने यंदाचे सत्र गाजवले आहे. त्याने 13 सामन्यांत 205.64च्या स्ट्राईक रेटने 510 धावा चोपल्या आहेत. त्यात तब्बल 52 षटकारांचा समावेश आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने 14 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकार खेचून 24 धावा केल्या. विजयानंतर कोलकाताच्या खेळाडूंनी जल्लोष केला. यावेळी रसेलने चक्क 'तैनू मै लव्ह करदा...' हे गाणं गायलं...
पाहा व्हिडीओ..
कॅप्टन दिनेश कार्तिकने आंद्रे रसेलला सुनावले खडे बोल
किंग्स इलेव्हन पंजाबचे सलामीवीर माघारी पाठवल्यानंतरही कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांना धावगतीवर चाप बसवता आला नाही. त्यामुळे संतापलेल्या कर्णधार दिनेश कार्तिकने स्ट्रॅटेजिक टाइम आऊटमध्ये आंद्रे रसेल व पीयूष चावला यांच्यावर राग काढला. रसेलने पहिल्याच षटकात 13, तर चावलाने 14 धावा दिल्या.
Web Title: IPL 2019: KKR's Andre Russell sing Hindi song
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.