चेन्नई, आयपीएल 2019: भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सनेराजस्थान रॉयल्सवर सहज विजय मिळवला. स्टीव्हन स्मिथच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 139 धावा केल्या होत्या. कोलकात्याने राजस्थानवर आठ विकेट्स राखून विजय मिळवला. सामना सुरु होण्यापूर्वी स्टेडियममध्ये वाळूचे वादळ आले होते. त्यानंतर कोलकात्याच्या वादळापुढे राजस्थानचा संघ बेचिराख झाल्याचे पाहायला मिळाले. या विजयासह कोलकात्याने अव्वल स्थान पटकावले आहे.
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकत कोलकाताने राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या रुपात राजस्थानला मोठा धक्का बसला. यावेळी अजिंक्यला पाच धावा करता आल्या. अजिंक्य रहाणेला गमावल्यावर राजस्थानची सुरुवात संथ झाली. यावेळी राजस्थानला पाच षटकांमध्ये 25 धावा करता आल्या. राजस्थानने स्टीव्हन स्मिथच्या चौकाराच्या जोरावर राजस्थानने नवव्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केेले. बटलरच्या रुपात राजस्थानला दुसरा धक्का बसला. बटलरला 34 चेंडूंत 37 धावा करता आल्या. स्टीव्हन स्मिथच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयटल्सला प्रथम फलंदाजी करताना 139 धावा केल्या. स्मिथने यावेळी 59 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद 73 धावा केल्या.
कोलकात्याने राजस्थानच्या आव्हानाचा पाठलाग करताना दमदार सुरुवात केली. कोलकाताचा सलामीवीर सुनील नरिनला 23 धावांवर असताना जीवदान मिळाले. धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर राहुल त्रिपाठीने नरिनला जीवदान दिले. पण नरिनला त्यानंतर मोठी खेळी साकारता आली नाही. सुनील नरिनच्या रुपात कोलकात्याला पहिला धक्का बसला. नरिनने 25 चेंडूंत 47 धावा केल्या, यामध्ये सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. त्यानंतर ख्रिस लिनने 31 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. यामध्ये सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. अर्धशतक झळकावल्यावर लिन दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. लिनने 32 चेंडूंत 50 धावा केल्या.
राजस्थान-कोलकाता सामन्यापूर्वी धडकलं वादळ, पाहा हा व्हिडीओ
राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यात कोणत्या फलंदाजाचे वादळ घोंगावणार, अशी चर्चा सुरु होती. पण सामना सुरु होण्यापूर्वी स्टेडियममध्ये वाळूचे वादळ आले होते. त्यामुळे खेळाडूंना सराव करता आला नाही. या वादळामुळे खेळाडूंचे मैदानावरील क्रीडा साहित्यही एका जागेवर राहत नव्हते. खेळपट्टी झाकण्याचा यावेळी पीच क्युरेटरकडून प्रयत्न करण्यात आला, पण त्यामध्येही त्यांना यश मिळत नव्हते. नेमकं काय चाललंय, हे साऱ्यांसाठीच अनाकलनीय असेच होते.
हा पाहा वादळाचा व्हिडीओ