कोलकाता, आयपीएल 2019 : कोलकाता नाईट रायडर्सला फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 218 धावा करता आल्या. कोलकात्याकडून रॉबिन उथप्पा आणि नितिश राणा यांनी अर्धशतके झळकावली.
पंजाबच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम कोलकात्याच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ख्रिल लिनच्या रुपात कोलकात्याला पहिला धक्का बसला. पण सुनील नरिनने धडाकेबाद फलंदाजी केली. नरिनने 9 चेंडूंत 24 धावा केल्या. त्यानंतर नितिश राणा आणि रॉबिन उथप्पा यांनी 110 धावांची भागीदारी रचली. राणाने दमदार फलंदाजी करताना 34 चेंडूंत दोन चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 63 धावांची तुफानी खेळी साकारली. रसेलने 17 चेंडूंत 48 धावांची वादळी खेळी साकारली.