मोहाली, आयपीएल 2019 : फॅफ ड्यू प्लेसिस आणि सुरेश रैना यांच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच केली आहे. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून विक्रमाला गवसणी घातली. त्यांना अंबाती रायुडू व महेंद्रसिंग धोनी यांचा विक्रम मोडला.
नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत प्ले ऑफचे स्वतःचे दरवाजे बंद करून घेतले. पंजाबला प्ले ऑफच्या आशा जीवंत राखण्यासाठी या सामन्यात 251+ धावांच्या फरकाने किंवा चेन्नईला 100च्या आत गुंडाळावे लागणार आहे. त्याचबरोबर त्यांना कोलकाताच्या पराभवाची प्रतीक्षा पाहावी लागेल. पण, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊन त्यांनी प्ले ऑफचा मार्ग स्वतः बंद केला आहे. चेन्नईने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 42 धावा केल्या. यंदाच्या आयपीएलमधील ही पॉवर प्लेमधील पाचवी सर्वोत्तम कामगिरी आहे. सॅम कुरनने पाचव्या षटकात वॉटसनला ( 7) त्रिफळाचीत केले. पण, फॅफ ड्यू प्लेसिस आणि सुरेश रैना यांनी चेन्नईचा डाव सावरला. चेन्नईने 9 षटकांत 1 बाद 67 धावा केल्या.