मोहाली, आयपीएल 2019 : किंग्स इलेव्हन पंजाबचे सलामीवीर माघारी पाठवल्यानंतरही कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांना धावगतीवर चाप बसवता आला नाही. त्यामुळे संतापलेल्या कर्णधार दिनेश कार्तिकने स्ट्रॅटेजिक टाइम आऊटमध्ये आंद्रे रसेल व पीयूष चावला यांच्यावर राग काढला. रसेलने पहिल्याच षटकात 13, तर चावलाने 14 धावा दिल्या.
प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाबसाठी ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांनी सावध खेळ केला. मात्र, संदीप वॉरियर्सच्या गोलंदाजीवर लोकेशला माघारी परतावे लागले. वॉरियर्सने टाकलेला स्लोवर चेंडूचा अंदाज बांधण्यात राहुल अपयशी ठरला आणि ख्रिस लीनने त्याचा सोपा झेल टिपला. पंजाबला 13 धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर वॉरियरने पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गेलचा अडथळा दूर केला. शुबमन गिलने सीमारेषेनजीक गेलचा झेल टिपला. गेलला 14 धावाच करता आल्या. त्यानंतर निकोलस पूरण आणि मयांक अग्रवाल यांनी पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पूरण आणि अग्रवाल या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.
पाहा व्हिडीओ..