30 Mar, 19 07:46 PM
30 Mar, 19 07:34 PM
राहुल आणि मिलरने अर्धशतकी भागीदारी केली. दोघांनी 30 चेंडूंत 50 धाव जोडल्या.
30 Mar, 19 07:24 PM
30 Mar, 19 07:23 PM
राहुलने 46 चेंडूंत 1 षटकार व 3 चौकार खेचून 53 धावा केल्या.
30 Mar, 19 07:13 PM
पंजाबने 15 षटकांत 140 धावा केल्या आणि त्यांना अखेरच्या पाच षटकांत विजयासाठी 37 धावांची गरज आहे.
30 Mar, 19 07:05 PM
कृणाल पांड्यानं पंजाबला आणखी एक हादरा दिला. लोकेश राहुल व मयांक अग्रवाल ही सेट जोडी त्यानं फोडली. कृणालने 14व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मयांकला झेलबाद केले. मयांकने 21 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 43 धावा केल्या.
30 Mar, 19 06:57 PM
30 Mar, 19 06:50 PM
किंग्स इलेव्हन पंजावच्या 10 षटकांत 84 धावा झाल्या आहेत.
30 Mar, 19 06:48 PM
30 Mar, 19 06:40 PM
हार्दिक पांड्याला दोन खणखणीत षटकार खेचणाऱ्या गेलला कृणाल पांड्याने बाद केले. आठव्या षटकात कृणालच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात गेल हार्दिकच्या हाती झेल देऊन बसला... गेलची कॅच पकडताच हार्दिकने मैदानावर डान्स केले.
30 Mar, 19 06:36 PM
30 Mar, 19 06:34 PM
हार्दिक पांड्याच्या पहिल्याच षटकात पंजाबच्या ख्रिस गेलने दोन खणखणीत षटकार खेचले. त्यामुळे पांड्या किंचितसा दडपणात आलेला पाहायला मिळाला.
30 Mar, 19 06:31 PM
30 Mar, 19 06:27 PM
गेलच्या फटकेबाजीनंतरही किंग्स इलेव्हन पंजाबला पॉवर प्लेमध्ये केवळ 38 धावा करता आल्या.
30 Mar, 19 06:24 PM
किंग्ल इलेव्हन पंजाबच्या ख्रिस गेलने शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध षटकारांचे त्रिशतक पूर्ण केले. त्याने मॅक्लेघनच्या दुसऱ्या षटकात सलग दोन षटकार खेचून आयपीएलमध्ये 300 षटकारांचा पराक्रम नावावर नोंदवला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये एकाही फलंदाजाला अद्याप 200 षटकारही मारता आलेले नाही.
30 Mar, 19 06:12 PM
ख्रिस गेलने पूर्ण केले षटकारांचे त्रिशतक
किंग्ल इलेव्हन पंजाबच्या ख्रिस गेलने शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध षटकारांचे त्रिशतक पूर्ण केले. त्याने मॅक्लेघनच्या दुसऱ्या षटकात सलग दोन षटकार खेचून आयपीएलमध्ये 300 षटकारांचा पराक्रम नावावर नोंदवला.
30 Mar, 19 05:48 PM
30 Mar, 19 05:40 PM
हार्दिक पांड्याने 19 चेंडूंत 31 धावा चोपल्या.
30 Mar, 19 05:33 PM
विलज्योनच्या दोन चेंडूंवर सलग चौकार मारणाऱ्या कृणाल पांड्याला तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा नाद नडला. मुरुगन अश्विनने त्याचा झेल टिपला,
30 Mar, 19 05:27 PM
मुंबई इंडियन्सने 17.4 षटकांत 150 धावा पूर्ण केल्या.
30 Mar, 19 05:24 PM
अॅण्ड्रू टायच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारणाऱ्या किरॉन पोलार्डाचा ( 7) अप्रतिम झेल... मयांक अग्रवालने सीमारेषेनजीक घेतला कॅच.
30 Mar, 19 05:14 PM
आर अश्विन आणि मुरुगन अश्विन यांनी 8 षटकातं 51 धावा देत 2 विकेट घेतल्या.
30 Mar, 19 05:12 PM
मुंबई इंडियन्सला 15 षटकांत 4 बाद 131 धावा करता आल्या.
30 Mar, 19 05:10 PM
त्यापाठोपाठ युवराज सिंगही माघारी परतला. लोकल बॉय युवीला मुरुगन अश्विनने बाद केले. युवीने 22 चेंडूंत 2 चौकारांसह 18 धावा केल्या.
30 Mar, 19 05:02 PM
मोहम्मद शमीनं 13व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर डी कॉकला पायचीत केले. डी कॉकने 39 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 60 धावा चोपल्या.
30 Mar, 19 04:56 PM
30 Mar, 19 04:54 PM
क्विंटन डी कॉकने 35 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकार खेचताना अर्धशतक पूर्ण केले. त्यानं षटकार खेचून अर्धशतक झळकावले.
30 Mar, 19 04:48 PM
डी कॉक आणि युवराज सिंग यांनी मुंबईच्या डावाला आकार देताना 10 षटकांत 2 बाद 91 धावांपर्यंत मजल मारून दिली.
30 Mar, 19 04:41 PM
क्विंटन डी कॉकने आयपीएलमध्ये 1000 धावांचा पल्ला पार केला. अवघ्या 37 डावांत त्याने ही कामगिरी केली.
30 Mar, 19 04:30 PM
मुरुगन अश्विनने पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सला धक्का दिला. त्याने सूर्यकुमार यादवला पायचीत करताना किंग्स इलेव्हन पंजाबला दुसरे यश मिळवून दिले. सातव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर यादव ( 11) बाद झाला.
30 Mar, 19 04:27 PM
सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हार्डस विलजोनने मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माला पायचीत केले. रोहितने 19 चेंडूंत 5 चौकारांसह 32 धावा केल्या.
30 Mar, 19 04:21 PM
रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मुंबईने 5 षटकातं 50 धावा केल्या. त्यात रोहितच्या 32, तर डी कॉकच्या 18 धावांचा समावेश आहे.
30 Mar, 19 04:08 PM
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने किंग्स इलेव्हन पंजाबच्या मोहम्मद शमीच्या पहिल्याच षटकात 12 धावा चोपल्या. त्यात दोन चौकारांचा समावेश होता.
30 Mar, 19 04:06 PM
मोहम्मद शीमच्या दुसऱ्याच चेंडूवर मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माने खणखणीत चौकार खेचला.
30 Mar, 19 03:59 PM
पहिलेच षटक टाकण्यासाठी किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर अश्विन सज्ज
30 Mar, 19 03:48 PM
2011पासून मुंबई इंडियन्स मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियमवर एकदाही पराभूत झालेला नाही. त्यांनी येथे खेळलेले चारही सामने जिंकले आहेत.
30 Mar, 19 03:47 PM
मुंबई इंडियन्सला आयपीएलमध्ये शंभर विजयांची नोंद करण्याची संधी आहे. आज पंजाबविरुद्ध विजय मिळवल्यात त्यांचे आयपीएलमधील विजयाचे शतक पूर्ण होईल आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच संघ ठरेल.
30 Mar, 19 03:42 PM
30 Mar, 19 03:39 PM
किंग्स इलेव्हन पंजाब : ख्रिस गेल, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, सर्फराज खान, मनदीप सिंग, डेव्हिड मिलर, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, अँड्रू टाय, मुरुगन अश्विन, हार्डस विलजोन
30 Mar, 19 03:38 PM
मुंबई इंडियन्स : क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, युवराज सिंग, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, किरॉन पोलार्ड, मिचेल मॅक्लेघन, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह, मयांक मार्कंडे
30 Mar, 19 03:35 PM
मुंबई इंडियन्सच्या संघात कोणताही बदल नाही. किंग्स इलेव्हन संघात मरुगन अश्विनला संधी, वरुण चक्रवर्थी माघारी.