16 Apr, 19 11:42 PM
विजयासह पंजाब चौथ्या स्थानावर
अटीतटीच्या लढतीत अखेर पंजाबने राजस्थानवर मात केली. पंजाबने राजस्थानपुढे 183 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग राजस्थानला करता आला नाही. या सामन्यात पंजाबने राजस्थानवर 12 धावांनी मात केली आणि या विजयासह पंजाबने चौथे स्थान पटकावले आहे.
16 Apr, 19 11:29 PM
राजस्थानला सहावा धक्का
मोक्याच्या क्षणी राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे बाद झाला.
16 Apr, 19 11:19 PM
जेफ्रो आर्चर आऊट
आर्चरला फक्त एक धाव काढता आली.
16 Apr, 19 11:16 PM
पहिल्याच सामन्यात टर्नर शून्यावर आऊट
16 Apr, 19 11:15 PM
अर्धशतकवीर राहुल त्रिपाठी आऊट
16 Apr, 19 10:52 PM
संजू सॅमसन आऊट
आर. अश्विनने संजू सॅमसनला बाद करत राजस्थानला दुसरा धक्का दिला. संजूला 21 चेंडूंत 27 धावा करता आल्या.
16 Apr, 19 10:22 PM
राजस्थानच्या पाच षटकांत 51 धावा
16 Apr, 19 10:16 PM
जोस बटलर आऊट
बटलरच्या रुपात राजस्थानला पहिला धक्का बसला. बटलरने 17 चेंडूंत 23 धावा केल्या.
16 Apr, 19 09:47 PM
प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा 182 धावा
16 Apr, 19 09:39 PM
डेव्हिड मिलर आऊट
16 Apr, 19 09:38 PM
मनदीप सिंग आऊट
16 Apr, 19 09:27 PM
पंजाबला मोठा धक्का
जयदेव उनाडकटने लोकेश राहुलला बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. राहुलने 52 धावा केल्या.
16 Apr, 19 09:23 PM
राहुलचे अर्धशतक
लोकेश राहुलने चौकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. राहुलने 45 चेंडूंत 51 धावा पूर्ण केल्या.
16 Apr, 19 09:15 PM
राहुल आणि मिलरने वाढवली धावगती
16 Apr, 19 09:06 PM
चौदाव्या षटकात पंजाबचे शतक
डेव्हिड मिलरने 14व्या षटकात एकेरी धाव घेत संघाचे शतक पूर्ण केले.
16 Apr, 19 08:48 PM
मयांक अगरवाल आऊट
मयांक अगरवालच्या रुपात पंजाबला दुसरा धक्का बसला. मयांकने 26 धावा केल्या.
16 Apr, 19 08:26 PM
ख्रिस गेल आऊट
धडाकेबाज फलंदाजी करणारा ख्रिस गेल 30 धावांवर बाद झाला. गेलला जेफ्रो आर्चरने यष्टीरक्षक संजू सॅमसनकरवी झेलबाद केले.
16 Apr, 19 08:11 PM
गेलचे सलग दोन षटकार
ख्रिस गेलने जयदेव उनाडकटच्या दुसऱ्या षटकात सलग दोन षटकार लगावले.
16 Apr, 19 08:04 PM
नाणेफेकीचा हा पाहा व्हिडीओ
16 Apr, 19 08:03 PM
पंजाब करणार प्रथम फलंदाजी
राजस्थानने नाणेफेक जिंकत पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.