मोहाली, आयपीएल 2019 : ख्रिस गेल हा वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर. वेस्ट इंडिजचे कॅलिप्सो हे नृत्य जगप्रसिद्ध आहे. गेलने बऱ्याचदा हे नृत्य करताना साऱ्यांनीच पाहिले आहे. पण आता आयपीएलमध्ये गेल किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघात आहे. पंजाबचा भांगडाही जगप्रसिद्ध आहे. गेलने हा भांगडा नृत्यप्रकार शिकला असून मुंबई इंडियन्सच्या सामन्यापूर्वी गेल भांगडा करताना पाहायला मिळाला.
मुंबई इंडियन्सचा संघ इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमात विजयी लय कायम राखण्यासाठी आज किंग्स इलेव्हन पंजाबचा सामना करत आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याच्या निमित्तानं लोकल बॉय युवराज सिंग आणि किंग्स इलेव्हन पंजाब असेही युद्ध पाहायला मिळेल. युवराज सिंग यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत आहे. मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील जय-पराजयाची आकडेवारी ही 12-10 अशी आहे.
हा पाहा खास व्हिडीओ
मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज आयपीएलचा सामना रंगत आहे. मुंबई इंडियन्सने मागच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत केले, तर पंजाबला कोलकाता नाइट रायडर्सकडून हार मानावी लागली. कोलाकाताविरुद्ध क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांचा फटका पंजाबला बसला. त्यामुळे या चुका सुधारून घरच्या मैदानावर मुंबईवर विजय मिळवण्यासाठी ते सज्ज आहेत. या सामन्याच्या निमित्ताने पंजाबचा लोकल बॉय युवराज सिंग विरुद्ध लोकल संघ किंग्स इलेव्हन पंजाब हा सामना पाहायला मिळणार आहे.