Join us  

IPL 2019, KXIPvMI : मुंबई-पंजाबच्या सामन्यातली ही पाहा कूल कॅच...

ही नक्कीच कॅच आहे की नाही, असा प्रश्नही काही जणांना पडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 6:28 PM

Open in App

मोहाली, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामना चांगलाच रंगतदार होत आहे. पण या सामन्यात एक कूल कॅच पाहायला मिळाली. ही नक्कीच कॅच आहे की नाही, असा प्रश्नही काही जणांना पडला. पण खेळाडूने अखेरपर्यंत चेंडूंवर नजर ठेवली आणि ही कॅच पकडली.

मुंबईचा किरॉल पोलार्ड हा धडाकेबाज फलंदाज आहे. पोलार्डकडे एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात पोलार्ड मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत होता. अॅण्ड्र्यू टायच्या एका चेंडूवर पोलार्डने मोठा फटका मारला मारला. हा फटका आता सीमारेषा ओलांडणार असे वाटत होते. पण त्यावेळी मयांक अगरवालने पोलार्डचा तो फटका अडवला. मयांकने तो फटका फक्त अडवला नाही तर सीमारेषेवर उत्तम झेलही टिपला. काही वेळा चाहत्यांना या गोष्टीवर विश्वास बसला नाही. पंचांनीही हा नक्कीच झेल आहे का, हे तपासून पाहिले. पण हा झेल योग्य होता आणि त्यामुळेच पोलार्डला बाद व्हावे लागले.

 क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांच्याशिवाय मुंबई इंडियन्सच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी साकारता आली नाही. किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना मुंबईला 20 षटकांत 176 धावांपर्यंत मजल मारून दिली. लोकल बॉय युवराज सिंगही फार करिष्मा करू शकला नाही. त्यामुळे त्याचे चाहते निराश झाले. कृणाल पांड्या व हार्दिक पांड्या यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना मुंबई इंडियन्सला समाधानकारक पल्ला गाठून दिला.  हार्दिक पांड्याने 19 चेंडूंत 31 धावा चोपल्या. 

रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मुंबईने 5 षटकातं 50 धावा केल्या. त्यात रोहितच्या 32, तर डी कॉकच्या 18 धावांचा समावेश आहे. सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हार्डस विलजोनने मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माला पायचीत केले. रोहितने 19 चेंडूंत 5 चौकारांसह 32 धावा केल्या. पहिल्या पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सने 1 बाद 62 धावा झाल्या होत्या. त्यानंतर मुरुगन अश्विनने त्याच्या पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सला धक्का दिला. त्याने सूर्यकुमार यादवला पायचीत करताना किंग्स इलेव्हन पंजाबला दुसरे यश मिळवून दिले. 

मोहम्मद शमीनं 13व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर डी कॉकला पायचीत केले. डी कॉकने 39 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 60 धावा चोपल्या. त्यापाठोपाठ युवराज सिंगही माघारी परतला. लोकल बॉय युवीला मुरुगन अश्विनने बाद केले. युवीने 22 चेंडूंत 2 चौकारांसह 18 धावा केल्या. मुंबई इंडियन्सला 15 षटकांत 4 बाद 131 धावा करता आल्या. आर अश्विन आणि मुरुगन अश्विन यांनी 8 षटकातं 51 धावा देत 2 विकेट घेतल्या. किरॉन पोलार्ड व हार्दिक पांड्या यांना अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यापासून पंजाबच्या गोलंदाजांनी रोखले. 

टॅग्स :मुंबई इंडियन्सकिंग्ज इलेव्हन पंजाबआयपीएल 2019