चेन्नई, आयपीएल २०१९ : यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला ते गुणतालिकेत १० गुणांसह अव्वल आहेत. चेन्नईचे फॅन्स मोठ्या प्रमाणात आहेत. चेन्नईच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी चेन्नईचे फॅन्स कुठेही जाऊ शकतात. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात एक असा फॅन पाहायला मिळाला की त्याला चेन्नईकडून खेळायचे आहे. हा फॅन एक लहान मुलगा आहे.
कोलकाताविरुद्धचा सामना चेन्नईने सहजपणे जिंकला. या सामन्यादरम्यान चेन्नईचा एक लहानगा फॅन स्टेडियममध्ये उपस्थित होता. यावेळी या लहान मुलाने एक फलक आणला होता. या फलकावर, " मी आता चेन्नईचा चाहता आहे. पण मला या संघातील खेळाडू व्हायला आवडेल, " असे म्हटले होते.
हा पाहा व्हिडीओ
महेंद्रसिंग धोनी, हे एक अजब रसायन आहे. धोनीचे वय जरी ३७ असले तरी युवा खेळाडूंना लाजवेल, अशी त्याची कामगिरी मैदानात पाहायला मिळते. यष्टीरक्षणाच्या बाबतीत तर त्याचा हा जगातला कोणताही यष्टीरक्षक सध्याच्या घडीला धरू शकत नाही. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा या गोष्टीचा अनुभव आला. यावेळी तर धोनीचा वेग हा ब्रॉडबँड इंटरनेटचपेक्षाही जास्त असल्याचे म्हटले जात आहे.
कोलकाता आणि चेन्नई यांच्यातील सामना चांगलाच रंजकदार होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने कोलकात्याच्या संघातील हवा काढून टाकली. चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला आणि कोलकाताचा संघ १०८ धावाच करू शकला.
धोनीचा यष्टीरक्षणाचा स्पीड केवढा भन्नाट आहे, हे या सामन्यात पाहायला मिळाले. इम्रान ताहिर अकरावे षटक टाकत होता. त्यावेळी कोलकात्याचा शुभमन गिल हा त्याचा सामना करत होता. अकराव्या षटकाच्या पहिल्याच चेंडू ताहिरने गुगली टाकला. त्यावर गिल फसला. हा चेंडू थेट धोनीच्या हातामध्ये आला आणि त्याने भन्नाट स्पीडने बेल्स उडवल्या. त्यावेळी तिसऱ्या पंचांचा निर्णय येण्यापूर्वीच ताहिरने सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. धोनीने यावेळी ज्यापद्धतीने यष्टीरक्षण केले ते पाहणे नजरेचे पारणे फेडणारे होते. तिसऱ्या पंचांनी जेव्हा पाहिले तेव्हा धोनीचा नेमका स्पीड केवढा आहे तो समजला. त्यावेळी धोनीचा स्पीड हा ब्रॉडबँड इंटरनेटचपेक्षाही जास्त असल्याचे आयपीएलच्या ट्विटर हँडलवर म्हटले गेले.