- सुनील गावसकर
रविवारी होणाऱ्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईविरुद्ध दोन हात करण्याआधी युवा खेळाडूंंसह सज्ज असलेला दिल्ली कॅपिटल्स आणि अनुभवी चेन्नई संघात शुक्रवारी सामना होईल. १२ व्या सत्रात दिल्लीच्या संस्मरणीय वाटचालीत युवा खेळाडूंचे योगदान उल्लेखनीय ठरले. मुक्तपणे फटकेबाजी करताना युवा खेळाडूंना पाहण्याची मजा काही वेगळीच. या युवा खेळाडूंना अनेकदा आव्हानांना सामोरे जावे लागले. हाच अनुभव संघासाठी उपयुक्त देखील ठरला. दिल्ली संघ अनुभवातून शिकून झपाट्याने प्रगती करीत आहे.
कीमो पॉलने ज्या पद्धतीने हैदराबादविरुद्ध फटकेबाजी करीत उपांत्यफेरीचा मार्ग मोकळा करुन दिला, त्यावरुन युवा खेळाडू परिस्थितीनुरुप स्वत:ला सज्ज करू शकतात, याचा अंदाज आला. मैदानावर दिल्लीचे खेळाडू आक्रमक दिसतात, तर दुसरीकडे कॅप्टन कूल धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने परिपक्वतेचे उदाहरण घालून दिले आहे.
क्षेत्ररक्षणादरम्यानही चेन्नईच्या क्षेत्ररक्षकांचा दृष्टिकोन कॅज्युअल असाच असतो. इम्रान ताहिर हा मात्र याला अपवाद ठरतो. तो सतत गडी बाद करण्याच्या शोधात असतो. गडी बाद केल्यानंतर मैदानावर चक्कर लावण्याची त्याची तºहा पाहण्याचा आनंदही वेगळाच असतो. स्फोटक फलंदाजांविरुद्ध तो चातुर्याने कमालीचा चेंडू टाकतो. या बळावर मोक्याच्या क्षणी बळी घेत संघासाठी स्वत:ची उपयुक्तता देखील सिद्ध करीत आहे. महेंद्रसिंग धोनी मैदानावर (विशेषत: डेथ ओव्हरमध्ये) उतरताच चेन्नईला नवी ऊर्जा मिळते. फलंदाजीसाठी क्रिजवर पाय स्थिरावण्याआधी माहीची तयारी पाहण्यासारखी असते. यानंतर जेथे एक धाव निघते तेथे तो दोन धावा नक्की घेतो. चोरटी धाव घेताना मैदान त्याच्यासाठी जणु काही राहते घर असते.
विशाखापट्टणम हे धोनीसाठी असे क्रिकेट केंद्र आहे, जेथे धोनीने धडाका करीत स्वत:ची खास ओळख निर्माण केली. याच ठिकाणी त्याने २००५ ला पाकिस्तानविरुद्ध १४८ धावा ठोकल्या होत्या. भारतीय संघाचा हा दिग्गज खेळाडू विशाखापट्टणमच्या मैदानावर पुन्हा एकदा अविस्मरणीय कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.
Web Title: IPL 2019: Mahendrasingh hopes to shine again
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.