मुंबई, आयपीएल 2019 - सुपर ओव्हरमध्ये सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवत मुंबई इंडियन्सने प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. हैदराबादने मुंबईपुढे सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 9 धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईने हे आव्हान लीलया पार केले आणि प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. निर्धारित 20 षटकांत मुंबई इंडियन्स केलेल्या 5 बाद 162 धावांच्या प्रत्युत्तरात हैदराबादने 6 बाद 162 धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने गनिमी कावा रचला होता त्यात हैदराबादचा संघ अडकला.
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मागील काही सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी स्वीकारलेले पाहायला मिळाले आहे. त्यामुळे रोहितचा हा निर्णय बुचकळ्यात टाकणारा होता. हाच रोहितचा गनिमी कावा होता. क्विंटन डी कॉकच्या (69) अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने 162 धावांचा समाधानकारक पल्ला गाठला. प्रत्युतरात मनीष पांडे (71) वगळता हैदराबादच्या एकाही फलंदाजाला आत्मविश्वासाने खेळ करता आला नाही. तरीही त्यांनी सामन बरोबरीत सोडवला. पण, सुपर ओव्हरमध्ये त्यांना अपयश आले.
पाहा व्हिडीओ...
https://www.iplt20.com/video/185397/i-back-my-bowlers-to-defend-runs-rohit-sharma