नवी दिल्ली, आयपीएल 2019 : दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला. हार्दिक आणि कृणाल या दोन्ही पंड्या बंधूंच्या फटकेबाजीमुळे मुंबईला दिल्लीपुढे 169 धावांचे आव्हान ठेवता आले. या आव्हानाचा पाठलाग करण्याता दिल्लीचा संघ अपयशी ठरला. मुंबईने या सामन्यात दिल्लीवर 40 धावांनी विजय मिळवला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे, त्याचबरोबर दिल्लीला त्यांच्या मैदानात पराभूत केले.
11:39 PM
मुंबई दुसऱ्या स्थानावर
11:26 PM
कागिसो रबाडा आऊट
रबाडाला हार्दिक पंड्याने किरॉन पोलार्डकरवी झेलबाद केले. रबाडाला 9 धावा करता आल्या.
10:58 PM
दिल्लीला पाचवा धक्का
रिषभ पंतच्या रुपात दिल्लीला पाचवा धक्का बसला. पंतला सात धावाच करता आल्या.
10:40 PM
श्रेयस अय्यर आऊट
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर तीन धावांवर बाद झाला.
10:37 PM
कॉलिन मुन्रो आऊट
कॉलिन मुन्रोच्या रुपात दिल्लीला तिसरा धक्का बसला. कॉलिनला तीन धावाच करता आल्या.
10:31 PM
दिल्लीला दुसरा धक्का
पृथ्वी शॉच्या रुपात दिल्लीला दुसरा धक्का बसला. पृथ्वीला 20 धावा करता आल्या.
10:25 PM
दिल्लीला पहिला धक्का
शिखर धवनच्या रुपात दिल्लीला पहिला धक्का बसला. धवनने 22 चेंडूंत 35 धावा केल्या.
09:46 PM
प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या 168 धावा
09:37 PM
हार्दिक पंड्या आऊट
हार्दिकच्या रुपात मुंबईला पाचवा धक्का बसला. हार्दिकने 15 चेंडूंत 32 धावा केल्या.
09:19 PM
सूर्यकुमार यादव आऊट
सूर्यकुमार यादवच्या रुपात मुंबईला चौथा धक्का बसला. सूर्यकुमार यादवने 27 चेंडूंत 26 धावा केल्या.
08:53 PM
क्विंटन डीकॉक आऊट
डीकॉकच्या रुपात मुंबईला तिसरा धक्का बसला. डीकॉकने 27 चेंडूंत 35 धावा केल्या.
08:41 PM
बेन कटिंग आऊट
बेन कटिंगच्या रुपात मुंबईला दुसरा धक्का बसला. कटिंगने दोन धावा केल्या.
08:34 PM
रोहित शर्मा आऊट
रोहित शर्माच्या रुपात मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला. रोहितने 22 चेंडूंत 30 धावा केल्या.
08:28 PM
मुंबईची दमदार सलामी
मुंबईच्या सलामीवीरांनी दमदार फलंदाजी करत पाच षटकांमध्ये संघाला 41 धावा करून दिल्या.
08:00 PM
मुंबईने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली
नाणेफेकीचा कौल यावेळी मुंबईच्या बाजूने लागला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने यावेळी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Web Title: IPL 2019 MI vs DC : मुंबईचा दिल्लीवर 40 धावांनी विजय
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.