10 Apr, 19 11:48 PM
पोलार्डचे २२ चेंडूंत अर्धशतक
पोलार्डने २२ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. पोलार्डने षटकारासह ५५ धावा पूर्ण केल्या.
10 Apr, 19 11:39 PM
मुंबईला सहावा धक्का
कृणाल पंड्याच्या रुपात मुंबईला सहावा धक्का बसला. कृणालला एकच धाव काढता आली.
10 Apr, 19 11:37 PM
मुंबईला पाचवा धक्का
हार्दिक पंड्याच्या रुपात मुंबईला पाचवा धक्का बसला. पंड्याने १३ चेंडूंत १९ धावा केल्या.
10 Apr, 19 11:19 PM
इशान किशन रनआऊट
इशान किशनच्या रुपात मुंबईला चौथा धक्का बसला.
10 Apr, 19 10:45 PM
सूर्यकुमार यादव आऊट
सूर्य़कुमार यादवला २१ धावा करता आल्या. सॅम कुरनने त्याला बाद केले.
10 Apr, 19 10:26 PM
सिद्धेश लाड आऊट
सिद्धेशच्या रुपात मुंबईला पहिला धक्का बसला. सिद्धेशने एक चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १५ धावा केल्या.
10 Apr, 19 09:39 PM
सॅम कुरन आऊट
10 Apr, 19 09:38 PM
करुण नायर आऊट
10 Apr, 19 09:29 PM
डेव्हिड मिलर आऊट
डेव्हिड मिलरच्या रुपात पंजाबला दुसरा धक्का बसला.
10 Apr, 19 09:15 PM
ख्रिस गेल आऊट
ख्रिस गेलच्या रुपात पंजाबला पहिला धक्का बसला. गेलने ३६ चेंडूंमध्ये ६३ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
10 Apr, 19 09:09 PM
राहुलचे अर्धशतक
राहुलने ४१ चेंडूंमध्ये आपेल अर्धशतक पूर्ण केले.
10 Apr, 19 08:57 PM
गेलच्या षटकाराने पंजाबची शंभरी
10 Apr, 19 08:57 PM
पंजाब बिनबाद १००
ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांनी मुंबईच्या गोलंदाजीची हवा काढली. तुफानी फटकेबाजी करत त्यांनी अकराव्या षटकात संघाचे शतक पूर्ण केले.
10 Apr, 19 08:28 PM
गेल तळपला
गेलने मुंबईविरुद्धच्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली. त्यामुळे पंजाबला पहिल्या पाच षटकांमध्ये बिनबाद ४३ अशी धावसंख्या उभारता आली.
10 Apr, 19 07:43 PM
रोहितला दुखापत, पोलार्डकडे संघाचे नेतृत्व
मुंबई इंडियन्सने मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर जोरदार सराव केला. पण, या सरावात कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे या सामन्यात रोहित खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रोहितच्या जागी किरॉन पोलार्ड मुंबईचे कर्णधारपद सांभाळणार आहे.
10 Apr, 19 07:39 PM
पंजाबची प्रथम फलंदाजी
पंजाबविरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबईच्या बाजूने लागला आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.