मुंबई, आयपीएल २०१९ : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे पुन्हा एकदा पराभवाचे पाढे या सामन्यात पाहायला मिळाले. गेल्या सामन्यात बंगळुरुचा संघ विजयाच्या मार्गावर परतला होता. पण या सामन्यात मात्र बंगळुरुला मुंबईकडून पराभव पत्करावा लागला. मुंबईने पाच विकेट्स राखून हा सामना जिंकला. हार्दिक पंड्याने १६ चेंडूंत नाबाद ३७ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे.
LIVE
Get Latest Updates
11:54 PM
मुंबई तिसऱ्या स्थानी
11:46 PM
विजयासह मुंबई तिसऱ्या स्थानावर
मुंबईने पाच विकेट्स राखून मुंबईने बंगळुरुला पराभूत केले. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. डी'व्हिलियर्सच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मुंबई इंडियन्सपुढे 172 धावांचे आव्हान ठेवता आले. अटीतटीच्या सामन्यात हार्दिक पंड्याने १६ चेंडूंत नाबाद ३७ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
11:15 PM
मुंबईला चौथा धक्का
सूर्यकुमार यादवच्या रुपात मुंबईला चौथा धक्का बसला. सूर्यकुमारने २९ धावा केल्या.
10:52 PM
मुंबईला तिसरा धक्का
इशान किशनच्या रुपात मुंबईला तिसरा धक्का बसला. किशनने 9 चेंडूंत 21 धावा केल्या.
10:40 PM
मुंबईला दुसरा धक्का
क्विंटन डी'कॉकच्या रुपात मुंबईला दुसरा धक्का बसला. क्विंटन डी'कॉकने २६ चेंडूंत ४० धावा केल्या.
10:37 PM
रोहित शर्मा आऊट, मुंबईला मोठा धक्का
रोहितच्या रुपात मुंबईला मोठा धक्का बसला. रोहितने 19 चेंडूंत २८ धावा केल्या.
09:40 PM
एबी डी'व्हिलियर्स बाद, बंगळुरुला मोठा धक्का
09:31 PM
मार्कस स्टॉइनिस आऊट
मार्कस स्टॉइनिसच्या रुपात बंगळुरुला चौथा धक्का बसला मार्कस स्टॉइनिसला एकही धाव करता आली नाही.
09:25 PM
बंगळुरुला तिसरा धक्का
मोईन अलीच्या रुपात बंगळुरुला तिसरा धक्का बसला. अलीने ३२ चेंडूंत ५० धावा केल्या.
09:06 PM
चौकारासह बंगळुरुचे शतक पूर्ण
एबी डी'व्हिलियर्सच्या चौकारासह बंगळरुने आपले शतक पूर्ण केले.
08:38 PM
बंगळुरुला दुसरा धक्का
पार्थिव पटेलच्या रुपात बंगळुरुला दुसरा धक्का बसला. पार्थिवने २० चेंडूंत २८ धावा केल्या.
08:13 PM
विराट कोहली आऊट
विराट कोहलीच्या रुपात बंगळुरुला मोठा धक्का बसला. कोहलीला आठ धावा करता आल्या.
08:06 PM
विराट कोहलीचा पहिल्याच चेंडूवर चौकार
विराट कोहलीने या सामन्यातील आपल्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला.
08:03 PM
नाणेफेक कशी झाली, पाहा हा व्हिडीओ...
08:02 PM
बंगळुरूची प्रथम फलंदाजी
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बंगळुरुचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे.
Web Title: IPL 2019 MI vs RCB : विजयासह मुंबई तिसऱ्या स्थानावर
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.