Join us  

IPL 2019 MIvsRR : फुटबॉल कौशल्यामुळे रोहित शर्मा बाद होण्यापासून वाचतो तेव्हा, Video

IPL 2019 MIvsRR: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात अजब दृश्य पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 4:56 PM

Open in App

मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात अजब दृश्य पाहायला मिळाले. प्रतिस्पर्धी गोलंदाजाने टाकलेला चेंडू अडवण्यासाठी रोहित शर्माने बॅटऐवजी चक्क पायाचा वापर केला. त्याचे हे फुटबॉल कौशल्य पाहून स्टेडियमवर हास्यकल्लोळ झाला.

कृष्णप्पा गौथमच्या तिसऱ्या षटकात मुंबई इंडियन्सने 18 धावा चोपल्या. क्विंटन डी कॉकने 13 धावा काढल्या, तर रोहितने 5 धावांची भर घातली. त्यानंतर धवल कुलकर्णीने टाकलेल्या चौथ्या षटकार रोहित-डी कॉक जोडीने 14 धावा जोडल्या. मुंबई इंडियन्सने पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता जवळपास दहाच्या सरासरीने 57 धावा केल्या. पॉवर प्लेमधील मुंबई इंडियन्सची ही दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली. त्यांनी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध 1 बाद 62 धावा केल्या होत्या. दुसऱ्यांदा मुंबई इंडियन्सने पॉवर प्लेमध्ये एकही विकेट गमावलेली नाही. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी करताच आणखी एक विक्रमाची नोंद केली. यंदाच्या आयपीएलमधली मुंबई इंडियन्सकडून झालेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. गौथमने टाकलेल्या दहाव्या षटकातही चांगलीच फटकेबाजी पाहायला मिळाली, परंतु त्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पुढे आलेल्या रोहितला बाद करण्यासाठी गौथमने चेंडू वाईडच्या दिशेने टाकला, रोहितनेही त्याचे फुटबॉल स्किल दाखवताना पायाने तो चेंडू अडवला. मुंबईने 10 षटकांत एकही विकेट न गमावता 92 धावा केल्या. पण पुढच्याच षटकात रोहित बाद झाला. जोफ्रा आर्चरने त्याला जोस बटलरकरवी झेलबाद केले. रोहितने 32 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकार खेचून 47 धावा केल्या. 

पाहा व्हिडीओ..https://www.iplt20.com/video/168882

 

टॅग्स :रोहित शर्माआयपीएल 2019मुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्स