चेन्नई, आयपीएल 2019 : चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानावर आणि बाहेर नेहमी शांत स्वभावामुळे ओळखला जातो. इंडियन प्रीमिअर लीगच्या सलामीच्या सामन्यात धोनीच्या संघाने विराट कोहलीच्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळूरूला लाजीरवाणा पराभव पत्करण्यास भाग पाडले. बंगळूरूचे ७० धावांचे लक्ष्य चेन्नईने ७ विकेट्स राखून सहज पार केले.
आयपीएलच्या या प्रवासात धोनीसोबत पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा हे नेहमी दिसतात. गतवर्षी झिवाने आपल्या क्युटनेसने सर्वांना आकर्षित केले. धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सने झिवाचे ते क्युट क्षण सोशल मीडियावर शेअर केले. असाच एक व्हिडीओ धोनीन रविवारी शेअर केला. या व्हिडीओत धोनी विविध भाषांमध्ये झिवाला काही प्रश्न विचारत आहे आणि तीही अगदी सहजतेने त्याची उत्तर देत आहे.
पाहा व्हिडीओ...
विजयी सलामीनंतरही 'कॅप्टन कूल' धोनी रागावला, जाणून घ्या कारण
गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने विजयी सलामी देताना रॉयल्स चॅलेंजर बंगळुरूचा धुव्वा उडवला. हरभजन सिंग, इम्रान ताहीर आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीनं बंगळुरूचा डाव 70 धावांत गुंडाळला आणि चेन्नईने हे माफक लक्ष्य सहज पार केले. नाणेफेकीचा कौल बाजूने लागल्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं संथ खेळपट्टी पाहून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय भज्जी, ताहीर आणि जडेजाने योग्य ठरवला. बंगळुरूच्या पार्थिव पटेलला दुहेरी धावा करता आल्या आणि उर्वरित दहा फलंदाज एकेरी धावेत माघारी परतले. चेन्नईने 17.4 षटकांत 71 धावा करताना विजयी सलामी दिली. अंबाती रायुडूने 42 चेंडूंत 28 धावा केल्या.
या विजयानंतर 'कॅप्टन कूल' धोनी प्रचंड संतापलेला दिसला. त्याने चेपॉकच्या खेळपट्टीवर नाराजी प्रकट केली आणि पुढील सामन्यात खेळपट्टी बदलण्याची मागणी केली. 37 वर्षीय धोनी म्हणाला,''या खेळपट्टीचा मलाही अंदाज नव्हता. आम्ही या खेळपट्टीवर सराव केला होता आणि या सामन्यात मोठी धावसंख्या होईल, असे आम्हाला वाटले होते. पण, सराव सामन्यात आम्ही प्रत्यक्ष सामन्यापेक्षा 30 धावा अधिक केल्या होत्या. त्यामुळे या खेळपट्टीने आम्हालाही आश्चर्यचकीत केले. या खेळपट्टीत सुधारणा होण्याची गरज आहे. दव असतानाही चेंडू प्रचंड फिरकी घेत होता. 80, 90, 100 धावा ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये खूपच कमी आहे. या पुढील सामन्यात अशी खेळपट्टी आम्हाला नक्कीच नकोय.''
Web Title: IPL 2019: MS Dhoni gives Ziva language lessons and she answers correctly, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.