IPL 2019 : महेंद्रसिंग धोनीवर 1-2 सामन्यांची बंदी घातली पाहिजे होती, वीरेंद्र सेहवाग

IPL 2019 : धोनी चेन्नई सुपर किंग्ससाठी जरा जास्तच भावनिक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 01:20 PM2019-04-14T13:20:01+5:302019-04-14T13:20:20+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 : MS Dhoni let off easily, should have been banned for at least 1-2 games, virender singh on no ball saga | IPL 2019 : महेंद्रसिंग धोनीवर 1-2 सामन्यांची बंदी घातली पाहिजे होती, वीरेंद्र सेहवाग

IPL 2019 : महेंद्रसिंग धोनीवर 1-2 सामन्यांची बंदी घातली पाहिजे होती, वीरेंद्र सेहवाग

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जयपूर, आयपीएल 2019 : राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी रुद्रावतार पाहायला मिळाला. कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या धोनीला असे वागताना पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या, अनेकांना तर स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. पंचांच्या निर्णयावर नाराजी प्रकट करत धोनीने चक्क मैदानावर धाव घेतली आणि पंचांशी हुज्जत घातली. या कृत्यावर त्याला मॅच फी मधील 50% रक्कम दंड म्हणून भरावी लागली. असे कृत्य करूनही धोनी स्वस्तात सुटला असल्याचे मत भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले. धोनीला 1-2 सामने बाकावर बसवायला हवे होते, असे स्पष्ट मत वीरूने मांडले. 

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात तिसरा चेंडू बेन स्टोक्सने फुलटॉस टाकला आणि पंचांचा हात नो बॉलच्या इशाऱ्याकडे गेला. मात्र पंचांनी हात आखडता घेत नो बॉलचा निर्णय मागे घेतला. यामुळे मैदानाबाहेर उभा असलेला धोनी मैदानात घुसत पंचांना या कृतीचा जाब विचारला. चेन्नईला तीन चेंडूंत 6 धावांची गरज होती. यावेळी  स्टोक्सने फुलटॉस चेंडू टाकला. यामुळे पंचांनी नो बॉलची खूण केली. मात्र, दुसऱ्या पंचांनी यास नकार देताच त्यांनी हात मागे घेतला. त्यानंतर मैदानाबाहेर असलेल्या धोनीने पंचांकडे धाव घेतली. 


एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता. त्याच्या या कृत्यावर वीरू म्हणाला,'' महेंद्रसिंग धोनीनं असं भारतीय संघासाठी केलं असतं तर नक्की आनंद झाला असता. पण, आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे आणि संघासाठी कोणावर रागावताना त्याला कधी पाहिले नाही. चेन्नई सुपर किंग्ससाठी तो जरा जास्तच भावनिक झाला. दोन फलंदाज मैदानावर असताना धोनीने तेथे येण्याची गरज नव्हती. ते दोघेही पंचांना नो बॉल बद्दल विचारत होतेच. धोनी मोठ्या कारवाईपासून थोडक्यात वाचला. त्याच्यावर 1-2 सामन्यांची बंदी झाली असती. धोनीच्या या कृत्यानंतर उद्या अन्य कर्णधारही मैदानात घुसून पंचांकडे दाद मागू शकतो, तर मग अशा परिस्थितीत पंचांचे महत्त्वच राहणार नाही.''      


वीरु पुढे म्हणाला,'' धोनीला 1-2 सामन्यासाठी निलंबित करायला हवे होते. जेणेकरून भविष्यात कोणताही कर्णधार अशी चूक करणार नाही. पंचही माणूस आहेत आणि धोनीकडूनही चुका झाल्या आहेत.'' 
 

Web Title: IPL 2019 : MS Dhoni let off easily, should have been banned for at least 1-2 games, virender singh on no ball saga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.