चेन्नई, आयपीएल 2019 : महेंद्रसिंग धोनीच्या कल्पक नेतृत्वासमोर किंग्स इलेव्हन पंजाबला हार मानावी लागली. धोनीने त्याच्या गोलंदाजांचा सुरेख वापर करताना पंजाबच्या धावगतीवर चाप बसवला आणि चेन्नई सुपर किंग्सने हा सामना 22 धावांनी जिंकला. 160 धावांचा पाठलाग करणाऱ्या पंजाबला 5 बाद 138 धावांवरच समाधान मानावे लागले. 2 बाद 7 अशा दयनीय अवस्थेत सापडलेल्या पंजाबच्या मदतीला लोकेश राहुल व सर्फराज खान ही जोडी धावली. या दोघांनी शतकी भागीदारी करताना चेन्नईच्या गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. पण, धोनीच्या रणनीतीसमोर ते अपयशी ठरले. सामन्यात कॅप्टन कूल धोनीचा पारा मात्र चढलेला पाहायला मिळाला. त्याने दीपक चहरला चांगलेच सुनावले.
धोनी फार क्वचितच रागावलेला पाहायला मिळाला आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने चहरला सुनावले. चहरने सलग दोन नो बॉल टाकल्यामुळे धोनी त्याच्यावर रागावला आणि भर मैदानात त्याने शाळा घेतली. त्यानंतर चहरने पंजाबच्या डेव्हिड मिलरचा त्रिफळा उडवला.
पाहा व्हिडीओ...
पंजाबच्या गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यासमोर चेन्नईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पंजाबचा कर्णधार आर अश्विनने दिलेल्या तीन धक्क्यातून सावरण्याची संधीच चेन्नईला मिळाली नाही. पण, महेंद्रसिंग धोनीनं अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजी मुळे चेन्नईला निर्धारीत 20 षटकांत 3 बाद 160 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात पंजाबला 5 बाद 138 धावाच करता आल्या.
लोकेश राहुलला नशिबाची साथ, धोनीचा थ्रो स्टम्पवर आदळला पण...पंजाबला अवघ्या 7 धावांवर 2 झटके बसले. ख्रिस गेल व लोकेश राहुल समोर असतानाही चेन्नईचा कर्णधार धोनीनं दुसरे षटक हरभजन सिंगला टाकण्यासाठी बोलावले. भज्जीनं हा निर्णय सार्थ ठरवताना गेल व मयांक अग्रवालला बाद केले. सर्फराज आणि राहुल यांच्या संयमी खेळीने पंजाबने 10 षटकांत 2 बाद 71 धावा केल्या. त्यात राहुलच्या 36, तर सर्फराजच्या 29 धावा होत्या. 13 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर राहुलला अपयश आले. रवींद्र जडेजाच्या चेंडूवर चोरटी धाव घेण्यासाठी राहुल पुढे गेला, परंतु धोनीने चपळाईने चेंडूकडे धाव घेतली. त्याने नेहमीच्या शैलीत चेंडू मागे न वळताच चेंडू थेट यष्टिंवर मारला. पण, बेल्स न पडल्याने राहुल बाद ठरला नाही. नशीबाचे पारडे राहुलच्या बाजूने झुकले होते.
पाहा व्हिडीओ...
https://www.iplt20.com/video/163766/d-j-vu-dhoni-creates-magic-but-bails-still-don-t-fall