चेन्नई, आयपीएल 2019 : कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा चक्क लेग स्पिन गोलंदाजीचा सराव करत असल्याचे पाहायला मिळाले. सामन्यापूर्वी धोनी नेट्समध्ये लेग स्पिन गोलंदाजी करत होता.
हा पाहा व्हिडीओ
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा कूल असल्याचे म्हटले जाते. मैदानात कशीही परिस्थिती असली तरी तो एकदम शांत असतो. पण काहीवेळा धोनी आपल्याला भडकलेलाही पाहायला मिळाला आहे. पण धोनी ज्याच्यावर भडकतो, त्याला तो मिठीही मारतो, असा एक किस्सा घडला आहे.
चेन्नईचा किंग्ज इलेव्हन पंजाबबरोबर एक सामना होता. या सामन्यात धोनी मैदानात सर्वांसमोर वेगवान गोलंदाज दिपक चहारवर भडकल्याचे पाहायला मिळाले. त्यावर धोनी असं खरंच वागू शकतो का, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला होता. या गोष्टीचा व्हिडीओही वायर झाला होता. पण याच दिपकने धोनीबाबतची या घटनेनंतरची गोष्ट सांगितली आहे.
दीपक म्हणाला की, " पंजाबविरुद्धच्या सामन्यात धोनी माझ्यावर थोडासा रागावला होता. खरंतर तो मला मार्गदर्शन करत होता. पण या घटनेनंतर माझ्या गोलंदाजीमध्ये सकारात्मक बदल झाला. सामना संपल्यावर खेळाडूंनी माझे अभिनंदनही केले. सामन्यानंतर धोनी माझ्याजवळ आला आणि मला मिठी मारली."
नेमके प्रकरण आहे तरी काय... महेंद्रसिंग धोनीच्या कल्पक नेतृत्वासमोर किंग्स इलेव्हन पंजाबला हार मानावी लागली. धोनीने त्याच्या गोलंदाजांचा सुरेख वापर करताना पंजाबच्या धावगतीवर चाप बसवला आणि चेन्नई सुपर किंग्सने हा सामना 22 धावांनी जिंकला. 160 धावांचा पाठलाग करणाऱ्या पंजाबला 5 बाद 138 धावांवरच समाधान मानावे लागले. 2 बाद 7 अशा दयनीय अवस्थेत सापडलेल्या पंजाबच्या मदतीला लोकेश राहुल व सर्फराज खान ही जोडी धावली. या दोघांनी शतकी भागीदारी करताना चेन्नईच्या गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. पण, धोनीच्या रणनीतीसमोर ते अपयशी ठरले. सामन्यात कॅप्टन कूल धोनीचा पारा मात्र चढलेला पाहायला मिळाला. त्याने दीपक चहरला चांगलेच सुनावले.
धोनी फार क्वचितच रागावलेला पाहायला मिळाला आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने चहरला सुनावले. चहरने सलग दोन नो बॉल टाकल्यामुळे धोनी त्याच्यावर रागावला आणि भर मैदानात त्याने शाळा घेतली. त्यानंतर चहरने पंजाबच्या डेव्हिड मिलरचा त्रिफळा उडवला.