चेन्नई, आयपीएल २०१९ : यंदाच्या आयपीएलमध्ये साऱ्यांनीच धास्ती घेतली आहे ती कोलकाता नाइट रायडर्सच्या आंद्रे रसेलची. कारण आतापर्यंतच्या कोलकात्याच्या विजयात रसेलने सिंहाचा वाटा उचलला आहे. जवळपास प्रत्येक विजयामध्ये रसेलची तुफानी खेळी पाहायला मिळाली आहे. आज कोलकाता आणि चेन्नई सुपर किंग्स यांचा सामना होणार आहे. पण चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला अजूनही छळत आहे ती रसेची तुफानी खेळी.
रसेल फक्त याच हंगामात धडाकेबाज फलंदाजी करतोय, असे नाही. गेल्या हंगामातही रसेलचा फटका बऱ्याच प्रतिस्पर्धी संघाला बसला होता. यामध्ये चेन्नईचाही समावेश आहे. गेल्या हंगामात चेन्नई आणि कोलकाता यांच्यामध्ये सामना झाला होता. या सामन्यात रसेलने जबरदस्त खेळी साकारली होती. धोनी अजूनही ती रसेलची खेळी विरसू शकलेला नाही.
गेल्या हंगामात चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील सामना चेपॉक येथे रंगला होता. या सामन्यात रसेलने ३६ चेंडूंत ८८ धावांची वादळी खेळी साकारली होती. या खेळीमध्ये रसेलने ११ गगनचुंबी षटकार लगावले होते. त्यामुळे धोनीने या सामन्यापूर्वीच रसेलचा धसका घेतला आहे की काय, असे म्हटले जात आहे.
एका व्हिडीओमध्ये धोनीने रसेलच्या या खेळीबाबत सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये रसेलला आवरणे किंवा झटपट बाद करणे किती कठिण असल्याचे धोनीने सांगितले आहे. संघातील अकरा खेळाडू रसेलला कसे थांबवू शकतात, असा सवालही धोनीने या व्हिडीओमध्ये विचारला आहे.
हा पाहा खास व्हिडीओ