चेन्नई, आयपीएल २०१९ : चांगली सुरुवात झाली नसली तरी महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जचा डाव फक्त सावरला नाही, तर सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. धोनीच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नईला 175 धावा उभारता आल्या. धोनीने ४६ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 75 धावा केल्या.
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकाराले आहे. त्यामुळे या सामन्यात चेन्नईला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. राजस्थानच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला. त्यामुळे चेन्नईचे तीन फलंदाज फक्त २७ धावांत बाद झाले. पण त्यानंतर मात्र धोनी आणि सुरेश रैना यांनी संघाला सावरले. रैनाने ३२ चेंडूंत ३६ धावा केल्या.
पाहा धोनी इफेक्ट, जेव्हा बेल्सलाही वाटते 'माही'ने खेळावेराजस्थानविरुद्धच्या सामन्यात चेन्नईची सुरुवात चांगली झाली नव्हती. चेन्नईने आपले पहिले तिन्ही फलंदाज २७ धावांमध्ये गमावले होते. त्यानंतर धोनी खेळायला आला. धोनीला बाद करण्याचे राजस्थानने बरेच प्रयत्न केले. पण स्टम्पच्या बेल्सला ते मान्य नसल्याचे पाहायला मिळाले.
हा प्रकार घडला तो पाचव्या षटकात. पाचवे षटक जेफ्रो आर्चर टाकत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूचा सामना धोनी करत होता. धोनीचा हा सामन्यातील दुसराच चेंडू होता आणि त्याने अजून आपले खातेही उघडले नव्हते. त्यावेळी हा पाचव्या षटकातील चौथा चेंडू यष्ट्यांना लागला होता. पण धोनी आऊट मा६ झाला नाही. कारण त्यावेळी स्टम्पवरील बेल्स पडली नाही आणि धोनी नाबाद राहिला.
हा पाहा खास व्हिडीओ