चेन्नई, आयपीएल 2019 : आयपीएलच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी आज चुरस रंगणार आहे ती मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन मातब्बर संघांमध्ये. आतापर्यंत या दोन्ही संघानी आयपीएलमध्ये नेत्रदीपक कमगिरी केली आहे. गुणतालिकेत अखेरच्या क्षणी मुंबईने चेन्नईकडून अव्वल स्थान हिरावून घेतले होते. या गोष्टीचा बदला चेन्नई आजच्या सामन्यात घेणार की मुंबई अंतिम फेरीत पोहोचणार, याची साऱ्यांना उत्सुकता असेल.
हा सामना चेन्नईच्या घरच्या मैदानात होणार आहे. चेन्नईने एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये सातपैकी सहा सामने जिंकले आहे. त्यमुळे या सामन्यात चेन्नईचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे. चेन्नईची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजीसाठी ओळखली जाते. त्यामुळे दोन्ही संघांत किती फिरकीपटू असतील, हे पाहणेही उत्सुकतेचे असेल. चेन्नईच्या मैदानात जास्त दव पाहायला मिळते. त्यामुळे यावेळी जो संघ नाणेफेक जिंकेल, धावांचा पाठलाग करण्याला प्राधान्य देईल.
दोन्ही संघांनी संघांनी प्रत्येकी तीनवेळा जेतेपदाचा मान मिळविला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने दमदार सुरुवात केली, पण मधल्या कालावधीत त्यांनी लय गमावली. त्यांना मोहालीमध्ये अखेरच्या साखळी लढतीत पंजाबने ६ गडी राखून पराभूत केले. चेन्नईसाठी सुखावणारी बाब म्हणजे ही लढत त्यांच्या घरच्या मैदानावर होत आहे. या मैदानावर चेन्नईची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. या सामन्यात जो संघ पराभूत होईल, त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी असेल. १० मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना खेळवण्यात येणार आहे.
प्रतिस्पर्धी संघमुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकाक, सूर्यकुमार यादव, युवराज सिंग, कीरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, मिशेल मैक्लीनागन, मयंक मार्कंडेय, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, अनमोलप्रीत सिंह, सिद्धेश लाड, अंकुल राय, एविन लुईस, पंकज जयस्वाल, बेन कटिंग, ईशान किशन, आदित्य तारे, रसिख सलाम, बरिंदर शरण, जयंत यादव, बूरान हेंडरिक्स, लसिथ मलिंगा.चेन्नई सुपरकिंग्स : महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, मुरली विजय, रवींद्र जडेजा, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्नोई, रितुराज गायकवाड, ड्वेन ब्रावो, कर्ण शर्मा, इम्रान ताहिर, हरभजन सिंग, मिशेल सँटनेर, शार्दुल ठाकूर, मोहित शर्मा, के.एम. आसिफ, दीपक चहर, एन.जगदीशन, स्कॉट के.