Join us  

IPL 2019 : सुपर ओव्हरमध्ये विजयासह मुंबई इंडियन्स प्ले-ऑफमध्ये दाखल

सुपर ओव्हरमध्ये हैदराबादवर विजय मिळवत मुंबई इंडियन्सने प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 12:00 AM

Open in App

मुंबई, आयपीएल २०१९ : सुपर ओव्हरमध्ये हैदराबादवर विजय मिळवत मुंबई इंडियन्सने प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. हैदराबादने मुंबईपुढे सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी ९ धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईने हे आव्हान लीलया पार केले आणि प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला.

सुपर ओव्हरमध्ये हैदराबादचा संघ चांगली फलंदाजी करू शकला नाही. अर्धशतकवीर मनीष पांडे पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. त्यानंतर मोहम्मद नबीने एक षटकार मारला, पण मोठा फटका मारण्याच्या नादात नबी आऊट झाला आणि हैदराबादला आठ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मुंबईचे हार्दिक पंड्या आणि किरॉन पोलार्ड हे मैदानात उतरले. रशिद खानच्या पहिल्याच चेंडूवर हारेद्कने षटकार लगावला आणि मुंबईचा विजय सुकर झाला. मुंबईने हा सामना तीन चेंडू राखून जिंकला.

 

मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील लढत अखेर सुपर ओव्हरमध्ये गेली. अखेरच्या चेंडूवर हैदराबादला जिंकायला सात धावांची गरज होती. पण अखेरच्या चेंडूवर मनीष पांडेने षटकार ठोकल्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

मुंबईच्या १६३ आव्हानाचा सामना करताना हैदराबादला चांगली सुरुवात करता आली नाही. पण मनीष पांडेने अर्धशतक झळकावत संघाचे आव्हान जिवंत ठेवले होते. पण त्याला हा सामना हैदराबादला जिंकवून दिला आला नाही. मनीष पांडेने ४७ चेंडूंत नाबाद ७१ धावा केल्या.

क्विंटन डी'कॉकच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सलासनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. डी'कॉकने ५८ चेंडूंत ६८ धावांची खेळी साकारली. या खेळीमध्ये डी'कॉकने सहा चौकार आणि दोन षटकार लगावले.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि क्विंटन डी'कॉक यांनी चांगली सुरुवात केली. पण आक्रमक खेळणाऱ्या रोहितला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. रोहितच्या रुपात मुंबईला मोठा धक्का बसला. रोहितला २४ धावा करता आल्या.

रोहित बाद झाल्यावर क्विंटन डी'कॉकने संघाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. रोहितनंतर सूर्यकुमार यादव, इव्हिन लुईस आणि हार्दिक पंड्या बाद झाले, पण क्विंटन डी'कॉकने मात्र एकबाजू लावून धरली आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

टॅग्स :मुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबाद