मुंबई, आयपीएल २०१९ : चेन्नईच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईला प्रथम फलंदाजी करताना 170 धावा केल्या. सूर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि त्याची कृणाल पंड्याबरोबरच्या भागीदारीमुळे मुंबईला ही सन्मानजक धावसंख्या उभारता आली. मुंबईचा डाव यावेळी सूर्यकुमार यादवने सावरला. त्याने ४३ चेंडूंत आठ चौकार आणि एक षटकार लगावत ५९ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. त्याबरोबर अखेरच्या दोन षटकांमध्ये हार्दिक पंड्या आणि किरॉन पोलार्ड यांनी ४५ धावा कुटल्या. हार्दिकने आठ चेंडूंत नाबाद २५ आणि पोलार्डने सात चेंडूंमध्ये नाबाद नाबाद १७ धावा फटकावल्या.
चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला, पण त्यांना आश्वासक सुरुवात करता आली नाही. क्विंटन डी'कॉकच्या रुपात मुंबईला पहिला धक्का बसला. क्विंटन डी'कॉकला चार धावा करता आल्या. त्यानंतर रोहित शर्माही काही वेळात बाद झाला, त्याने १३ धावा केल्या. .युवराज सिंगही यावेळी चार धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कृणाल पंड्या यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला सावरले. पंड्याने ३२ चेंडूंत ४२ धावा केल्या.
रोहित शर्मावर येऊ शकते बंदी
आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबईला लसिथ मलिंगाच्या रुपात धक्का बसला आहे. पण यापुढच्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसू शकतो. कारण मुंबईचा कर्णधार रोहित शर्मावर बंदीची टांगती तलवार असल्याचे म्हटले जात आहे.पंजाबविरुद्धच्या सामन्यात रोहितला १२ लाख रुपयांचा दंड भरावा लागला आहे. षटकांची गती कमी राखल्याबद्दल त्याला हा दंड ठोठावण्यात आला होता. पण यापुढे जर रोहितकडून ही चूक पुन्हा घडली तर रोहितवर काही सामन्यांसाठी बंदी घालण्यात येऊ शकते. त्यामुळे ही मुंबईसाठी मोठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जात आहे.
काय आहे नियम
जर एका संघाने षटकांची योग्य गती राखली नाही तर त्या संघाच्या कर्णधाराला दंड ठोठावण्यात येतो. पण हीच चूक दुसऱ्यांदा घडली तर त्या कर्णधारावर काही सामन्यांसाठी बंदी घालण्यात येऊ शकते. यापूर्वी बऱ्याचदा मुंबईने षटकांची गती कमी राखलेली आहे. त्यामुळे यापुढे त्यांना या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.
मुंबई इंडियन्सला धक्का, लसिथ मलिंगा मायदेशी परतला
मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज लसिथ मलिंगाने आपला विचार बदलला असून त्याने इंडियन प्रीमिअर लीगमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेती उद्यापासून सुरू होणाऱ्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी तो मायदेशी रवाना झाला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध आज होणाऱ्या सामन्यात तो खेळणार नसल्याने मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. मलिंगा मायदेशात परतणार असल्याची माहिती श्रीलंका क्रिकेट मंडळाने मंगळवारी दिली होती, परंतु मुंबई इंडियन्सकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.