मुंबई, आयपीएल २०१९ : आज सामना रंगणार आहे तो मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही दादा संघांमध्ये. या सामन्यात मुंबईला विजयाचा शतकोत्सव साजरा करण्याची संधी आहे. नेमके हे प्रकरण काय आहे, तुम्हाला माहिती आहे का...
आतापर्यंत आयपीएलमध्ये मुंबईने १७४ सामने खेळले आहेत. या १७४ सामन्यांमध्ये मुंबईला ७५ सामने गमवावले लागले आहेत, तर ९९ लढतींमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे चेन्नईवर त्यांनी या लढतीत मात केली तर तो त्यांचा शंभरावा विजय ठरणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. त्यामुळे मुंबईचा संघ घरच्या मैदानात शतकोत्सव साजरा करणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.
आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक विजय मुंबईच्या नावावर आहेत, तर या यादीमध्ये चेन्नईचे दुसरा आणि सनरायझर्स हैदराबादचा तिसरा कॅमांक लागतो. आतापर्यंत चेन्नईच्या संघाने १५१ सामने खेळले आहे, यामध्ये त्यांना ९३ सामन्यांमध्ये विजय आणि ५६ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. हैदराबादच्या संघाने आतापर्यंत ९६ सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांना ५३ सामने जिंकता आले आहेत तर ४२ सामन्यांध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
रोहित शर्मावर येऊ शकते बंदी
आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबईला लसिथ मलिंगाच्या रुपात धक्का बसला आहे. पण यापुढच्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसू शकतो. कारण मुंबईचा कर्णधार रोहित शर्मावर बंदीची टांगती तलवार असल्याचे म्हटले जात आहे.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात रोहितला १२ लाख रुपयांचा दंड भरावा लागला आहे. षटकांची गती कमी राखल्याबद्दल त्याला हा दंड ठोठावण्यात आला होता. पण यापुढे जर रोहितकडून ही चूक पुन्हा घडली तर रोहितवर काही सामन्यांसाठी बंदी घालण्यात येऊ शकते. त्यामुळे ही मुंबईसाठी मोठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जात आहे.
काय आहे नियम
जर एका संघाने षटकांची योग्य गती राखली नाही तर त्या संघाच्या कर्णधाराला दंड ठोठावण्यात येतो. पण हीच चूक दुसऱ्यांदा घडली तर त्या कर्णधारावर काही सामन्यांसाठी बंदी घालण्यात येऊ शकते. यापूर्वी बऱ्याचदा मुंबईने षटकांची गती कमी राखलेली आहे. त्यामुळे यापुढे त्यांना या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.
मुंबई इंडियन्सला धक्का, लसिथ मलिंगा मायदेशी परतला
मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज लसिथ मलिंगाने आपला विचार बदलला असून त्याने इंडियन प्रीमिअर लीगमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेती उद्यापासून सुरू होणाऱ्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी तो मायदेशी रवाना झाला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध आज होणाऱ्या सामन्यात तो खेळणार नसल्याने मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. मलिंगा मायदेशात परतणार असल्याची माहिती श्रीलंका क्रिकेट मंडळाने मंगळवारी दिली होती, परंतु मुंबई इंडियन्सकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.
Web Title: IPL 2019: mumbai indians one win away from becoming first team to win 100 matches in ipl
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.