मुंबई, आयपीएल २०१९ : मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. या विजयासह मुंबईने चौथ्यांदा जेतेपद पटकावले. सोमवारी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूची प्यारवाली लव्हस्टोरी समोर आली आहे.
त्या दोघांची भेट पाच वर्षांपूर्वी झाली. त्यावेळी तो आयपीएल खेळत होता आणि ती कॉलेजमध्ये शिकत होती. या दोघांचेही एकच कॉलेज होते. तो बी कॉमच्या पहिल्या वर्षाला होता, तर ती बारावीमध्यो होती. कॉलेजमध्ये एकदा त्याने तिचा डान्स पाहिला आणि त्याचा कलिजा खल्लास झाला. त्याला डान्स तर आवडलाच, पण डान्स करणारीही आवडली. दुसरीकडे तीदेखील त्याची फॅन होती. कारण तिनेही त्याचा आयपीएलमधला खेळ पाहिला होता. त्यानंतर जवळपास पाच वर्षे ते रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर २०१६ साली या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा मुंबई इंडियन्सचा फलंदाज नेमका आहे तरी कोण? हा फलंदाज मुंबईच्या रणजी संघाचा एक भाग आहे. त्याचबरोबर त्याने आतापर्यंत मुंबईच्या रणजी संघाचे नेतृत्वही केले आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्समध्ये येण्यापूर्वी तो कोलकाता नाइट रायडर्स संघाचा एक भाग होता. त्यानंतर आता मुंबईच्या संघात एक सातत्यपूर्ण फलंदाज म्हणून त्याचे नाव घेतले जाते. मुंबई इंडियन्सचा तो खेळाडू आहे सूर्यकुमार यादव. आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सूर्यकुमारने आपले संघातील स्थान टिकवले आहे.
सूर्यकुमार आणि देविशा हे दोघेही मुंबईतील पोद्दार कॉलेजचे विद्यार्थी. सूर्यकुमारने देविशाला कॉलेजमध्येच डान्स करताना पाहिले आणि तो तिच्यावर फिदा झाला. यानंतर या दोघांमध्ये पाच वर्षे अफेअर सुरु होते. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या लग्नाला आता तीन वर्षे पूर्ण झाली आहेत.
मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्स झाले मालामाल; बक्षिसांचा वर्षाव!
विवारी झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात बाजी मारून मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या १२व्या सत्राचे दिमाखात जेतेपद पटकावले. यासह चौथ्यांदा आयपीएलवर वर्चस्व राखलेल्या मुंबईकरांनी तब्बल २० करोड रुपयांच्या बक्षिसावरही कब्जा केला. उपविजेता ठरलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघावरही तब्बल १५ करोड रुपयांच्या बक्षिसाचा वर्षाव झाला.
Web Title: IPL 2019: Mumbai Indian's Players Love Story
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.