Join us  

IPL 2019 : बंगळुरुचे पुन्हा पराभवाचे पाढे, मुंबई विजयी

बंगळुरुला मुंबईकडून पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 11:37 PM

Open in App

मुंबई, आयपीएल २०१९ : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे पुन्हा एकदा पराभवाचे पाढे या सामन्यात पाहायला मिळाले. गेल्या सामन्यात बंगळुरुचा संघ विजयाच्या मार्गावर परतला होता. पण या सामन्यात मात्र बंगळुरुला मुंबईकडून पराभव पत्करावा लागला.

 

मुंबईने पाच विकेट्स राखून हा सामना जिंकला. हार्दिक पंड्याने १६ चेंडूंत नाबाद ३७ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे.

 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या १७२ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने दमदार सलामी दिली. पहिल्या सहा षटकांमध्ये मुंबई दहाच्या सरासरीने धावा केल्या. पण त्यानंतर मात्र मुंबईला रोहित शर्मा आणि क्विंटन डी'कॉकच्या रुपात दोन धक्के बसले. रोहितने २८ तर  डी'कॉकने ४० धावा केल्या. त्यानंतर इशान किशनने ९ चेंडूंत २१ धावांची खेळी साकारली. त्यानंतर कृणाल पंड्या आणि सूर्यकुमार यादव संघाचा डाव सावरला. पण मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्यकुमार २९ धावांवर बाद झाला.

मुंबई, आयपीएल २०१९ : एबी डी'व्हिलियर्सची वादळी खेळी पाहण्याचा योग आज वानखेडेवर आला. डी'व्हिलियर्सच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मुंबई इंडियन्सपुढे 172 धावांचे आव्हान ठेवता आले.

मुंबईने नाणेफेक जिंकून बंगळुरुला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पण बंगळुरुला पहिलाच धक्का कर्णधार विराटकोहलीच्या रुपात बसला. कोहलीला आठ धावा करता आल्या. त्यानंतर पार्थिव पटेलही फटकेबाजी करत होता, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. पार्थिवने २० चेंडूंत २८ धावा केल्या. 

पार्थिव पटेल बाद झाल्यावर वानखेडेवर आले ते एबी डी'व्हिलियर्सचे वादळ. डी'व्हिलियर्सला यावेळी मोईन अलीने चांगली साथ दिली. या दोघांनी बंगळुरूची धावांची गती वाढवली. अलीने ३२ चेंडूंत ५० धावा केल्या.

अली बाद झाल्यावर डी'व्हिलियर्सने अखेरच्या षटकांमध्ये मोठी फटकेबाजी केली. डी'व्हिलियर्सने ५१ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ७५ धावा केल्या.

टॅग्स :हार्दिक पांड्यामुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर