मुंबई, आयपीएल 2019 : मुंबईने आयपीएलचे चौथे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीचा सामना रोमहर्षक झाला. अखेरचा चेंडू पडेपर्यंत नेमका कोणता संघ हा सामना जिंकेल, हे कोणाच्याही गावी नव्हते. त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या मालकिण नीता अंबानी चांगल्याच टेन्शनमध्ये आल्या होत्या. त्यावेळी अंबानी कुठलाही तरी मंत्र म्हणत असल्याचे पाहायला मिळाले. जेव्हा मुंबईने सामना जिंकला तेव्हा अंबानी डोळे बंद करून मंत्र म्हणत होत्या, त्यामुळे त्यांना मुंबईचा विजय पाहता आला नाही. आता सर्वांना प्रश्न पडला आहे की, हा विजयाचा मंत्र नेमका आहे तरी काय. त्यामुळे आता चाहत्यांनी अंबानी यांना हा मंत्र शेअर करायची विनवणी केली आहे.
मुंबई इंडियन्सने किरॉन पोलार्डच्या ( 25 चेंडूंत नाबाद 41 धावा ) धडाकेबाज खेळीच्या जोरावर 8 बाद 149 धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला 7 बाद 148 धावांपर्यंतच मजल मारता आली. शेन वॉटसनने ( 80 धावा) एकाकी झुंज दिली. पण, अखेरच्या षटकात लसिथ मलिंगाने चेन्नईच्या तोंडचा घास पळवला आणि मुंबईचे चौथ्यांदा आयपीएलचा चषक उंचावला.
मुंबई इंडियन्सच्या मिरवणूकीसाठी बस सज्ज
मुंबई इंडियन्सने रविवारी आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली. मुंबईने हैदराबादमध्ये झालेल्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्सवर अखेरच्या चेंडूवर मात केली आणि जेतेपद पटकावले. विजयानंतर संघाने मैदानात सेलिब्रेशन केले. पण आता त्यांची जंगी मिरवणूकही काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीसाठी खास बस बनवण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सच्या विजयी शिलेदारांनी खुल्या बसमधून मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता या मिरवणूकीला पेडर रोडपासून सुरुवात होईल आणि त्यानंतर ट्रायडंट हॉटेपर्यंत ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात येतील.
अशी असेल मिरवणूक....
सायंकाळी 6.30 वाजता खुल्या बसमधून अँटिलिया येथून मिरवणूकीला सुरुवात होईल
मिरवणूकीतील सुरुवातीचा 400 मीटरचा प्रवास हा पुणेरी ढोलच्या गजरात काढण्यात येणार आहे
जस्लोक हॉस्पिटल ते मरीन ड्राईव्ह येथून बस ट्रायडंटच्या दिशेने नेण्यात येईल
त्यानंतर रात्री 9 वाजता अँटिलिया येथे खेळाडू, संघ मालक, सेलिब्रिटी यांच्या उपस्थितील पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे .
Web Title: IPL 2019: Neeta ambani pray for mumbai indians during ipl final match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.