मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने आपल्या लूकमध्ये बदल केला आहे. मुंबई इंडियन्सने या हंगामासाठी नवीन जर्सी बनवली आहे. या जर्सीमध्ये खेळाडू कसे दिसतील, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.
हा पाहा खास व्हिडीओ
मुंबई इंडियन्स भिडणार कोणाला; सामने कधी व कोणाशी? इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) 12 व्या हंगामाचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. 23 मार्चपासून सुरू होणाऱ्या लीगच्या पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू हे भिडणार आहेत. लोकसभा निवडणुका लक्षात ठेवता पहिल्या दोन आठवड्यांचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित वेळापत्रकाची घोषणा करण्यात येणार आहे. महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली यांच्यात सलामीचा सामना होणार असला तरी सर्वांना उत्सुकता लागली आहे ती मुंबई इंडियन्सच्या सामन्यांची.
मुंबई इंडियन्सचे सामने कधी व कोणाशी? 24 मार्च मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स मुंबई28 मार्च रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स बंगळुरू30 मार्च किंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स मोहाली3 एप्रिल मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज मुंबई
मुंबई इंडियन्सच्या यशामागची मेहनत इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) सर्वात यशस्वी संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्स हे नाव आघाडीवर असले तरी मुंबई इंडियन्सने त्यांना तोडीसतोड टक्कर दिली आहे. आयपीएलचे सर्वाधिक जेतेपदकं पटकावणाऱ्या संघांत चेन्नई व मुंबई प्रत्येकी 3 चषकांसह आघाडीवर आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यंदा मुंबई आणखी एक जेतेपदाचा चषक उंचावण्यासाठी सज्ज आहे आणि 2019च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध ते पहिला सामना खेळणार आहेत. चेन्नईप्रमाणे मुंबई इंडियन्सचाही मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोअर्स आहेत. मुंबई इंडियन्सच्या या यशामागच्या मेहनतीवर लवकरच डॉक्युमेंटरी येणार आहे आणि त्याचा ट्रेलर लाँच करण्यात आला.बॉलिवूड आणि क्रिकेट हे न तुटणारे कनेक्शन आहे. जिथे क्रिकेट तिथे बॉलिवूड आणि जिथे बॉलिवूड तिथे क्रिकेट... हे समीकरण गेली अनेक वर्ष दिसत आहे. आयपीएलमुळे हे नातं आणखी घट्ट झाले आहे. त्यामुळेच आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक मुंबई इंडियन्सची बॉलिवूडमध्ये एन्ट्री होणार आहे. नेटफ्लिक्सच्या वेबसीरिजमध्ये ‘Cricket Fever: Mumbai Indians’ या नावाने मुंबई इंडियन्सवर डॉक्युमेंटरी तयार केली जात आहे. आठ भागाच्या या डॉक्युमेंटरीत मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधील प्रवास दाखवण्यात येणार आहे. 1 मार्च 2019 ला या डॉक्युमेंटरीचा पहिला भाग प्रसिद्ध होणार आहे.