मुंबई, आयपीएल 2019 : यंदाच्या आयपीएलला 23 मार्चला सुरुवात होत आहे. आता आयपीएल सुरु व्हायला काही दिवसच शिल्लक असताना स्पर्धेचे थीम साँग झाले लाँच करण्यात आले आहे. या थीम साँगमध्ये विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मासह काही क्रिकेटपटूंनी काम केले आहे.
हा व्हिडीओ 90 सेकंदांचा बनवण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक सर्वसाधारण मुलांचा आणि दुसरा नामांकित क्रिकेटपटूंचा ग्रुप क्रिकेट खेळताना दाखवला आहे. खेळत असताना त्यांच्यामध्ये भांडण होत असतात आणि हे भांडण सोडवतो तो भारताचा माजी कर्णधार कूल महेंद्रसिंग धोनी. धोनी या मुलांना आपल्याकडे बोलावतो आणि क्रिकेट खेळायला सांगतो. या व्हिडीओमध्ये त्यानंतर विराट कोहलीची एंट्री आहे.
हा पाहा व्हिडीओ
रिषभ पंतचे भारी चॅलेंज कॅप्टन कूल धोनीनं स्वीकारलं...
http://www.lokmat.com/cricket/ipl-2019-captain-cool-ms-dhoni-accepted-rishabh-pants-challenge/इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल) पडघम वाजू लागले आहेत. भारतीय संघात एकजूटीने खेळणारे खेळाडू आयपीएलमध्ये एकमेकांना आव्हान देण्यासाठी सज्ज होत आहेत. पण, याची प्रचिती आतापासूनच येत आहे युवा यष्टिरक्षक रिषभ पंतने काही दिवसांपूर्वी भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला चॅलेंज केले होते. त्यामुळे कॅप्टन कूल धोनी त्यावर काय प्रतिक्रीया देतो, याची सर्वांना उत्सुकता लागली होती. अखेर पंतचे आव्हान स्वीकारत धोनीनं त्याला मोलाचा सल्ला दिला.
भारतीय क्रिकेट संघात धोनीचा वारसदार म्हणून पंतकडे पाहिले जात आहे. पंतनेही अल्पावधीतच सातत्यपूर्ण कामगिरी करून संघातील स्थान पक्के केले आहे. त्यामुळे धोनीच्या अनुपस्थितीत पर्यायी यष्टिरक्षक म्हणून दिनेश कार्तिकऐवजी पंतची निवड करण्यात आलेली आहे. वर्ल्ड कप संघातही धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणून पंतच्याच नावाचा विचार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळेच पंतने थेट माहीला चॅलेंज दिले होते. पंतने एक व्हिडीओ ट्विट करून थेट धोनीला आव्हान केले होते.
कॅप्टनला 'चिकू' म्हणणं जसप्रीत बुमराला पडणार महागात, कोहलीचे संकेतhttp://www.lokmat.com/cricket/ipl-2019-apne-captain-ko-sledge-karega-virat-kohli-responds-jasprit-bumrah/
इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) 23 मार्चपासून सुरू होणार आहे. महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या आयपीएलच्या तयारीसाठी सर्व संघ कसून सराव करत आहेत. आयपीएलच्या निमित्ताने भारतीय संघात एकत्र खेळणारे खेळाडू एकमेकांविरुद्ध पुन्हा दंड थोपटण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण, मैदानावरील प्रत्यक्ष युद्धापूर्वी हे खेळाडू मैदानाबाहेर एकमेकांना आव्हानं देत आहेत. काही दिवसांपूर्वी रिषभ पंतने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला, तर जसप्रीत बुमराने सध्याचा कर्णधार विराट कोहलीला चॅलेंज केले होते. बुमराहच्या या आव्हानाला कोहलीने उत्तर दिले आहे आणि त्याला चिकू म्हणणं महागात पडेल, असेही तो म्हणाला.
मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बुमराने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात त्याने कोहलीला बाद करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो म्हणाला,''मी सर्वोत्तम गोलंदाज.... नाही यार अजून तर जगातील सर्वोत्तम फलंदाजाला ( विराट कोहली) त्रिफळाचीत करायचे आहे. मी येतोय चिकू भैया (कोहली) आणि यावेळी तु माझ्या संघातही नसशील.''
यावर विराटने उत्तर दिले. तो म्हणाला,'' चिकू भैया? आता कॅप्टनशीच स्लेजिंग. शेवटी तुही शिकलास, फक्त चिकू भैयाकडून कोणतीही उधारी अपेक्षित ठेवू नकोस.''