बंगळुरु, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद आजच्या सामन्यात एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली. या सामन्यातील एक कॅच योग्य आहे की नाही, यासाठी आयपीएलने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओपुढे त्यांनी हा फलंदाज आऊट आहे की नाही, ते तुम्हीच थर्ड अम्पायर बनून ठरवा, असे म्हटले आहे.
ही गोष्ट घडली ती वॉशिंग्टन सुंदरच्या आठव्या षटकात. या आठव्या षटकातील पाचव्या चेंडूवर मनीष पांडेने मोठा फटका मारला. हा चेंडू उंच उडाला आणि झेल घेण्यासाठी आरबीसीचा हेटमायर सरसावला. त्यावेळी हेटमायरने सूर मारत चांगलाच झेल टिपला. त्यावेळी हा झेल आहे की नाही, यासाठी मैदानातील पंचांनी थर्ड अम्पायरला विचारणा केली. त्यानंतर आयपीएलने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना आवाहन केल्याचे पाहायला मिळाले आहे.
हा पाहा व्हिडीओ
जेव्हा उडी मारून पार्थिव पटेल गेला स्टम्पिंग करा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आजच्या सामन्यात एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली. आरसीबीचा यष्टीरक्षक पार्थिव पटेलने चक्क हवेत उडी मारून स्टम्पिंग करायला प्रयत्न केला.
ही गोष्ट घेतली ती सहाव्या षटकामध्ये. हे षटक युजवेंद्र चहल टाकत होता. यावेळी चहलचा सामना करत होता तो मनीष पांडे. सहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मनीष पांडेल चकला. त्याच्या पायाला लागून चेंडू पटेलच्या दिशेने गेला. त्यावेळी पटेलने हवेत उडी मारत मनीषला यष्टीचीत करण्याचा उत्तम प्रयत्न केला.
हा पाहा व्हिडीओ
यंदाच्या आयपीएलमध्ये कोहली आज पहिल्यांदाच ठरला लकी, घडली 'ही' गोष्ट
यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. पण तरीदेखील कोहली आज सामन्यापूर्वी आनंदात पाहायला मिळाला. कारण यंदाच्या हंगामात ही गोष्ट पहिल्यांदाच कोहलीच्या बाबतीत पाहायला मिळाली.
या सामन्यात आरसीबीने संघात तीन बदल केले. सामन्यापूर्वी कोहली आणि हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सन टॉससाठी एकत्र आले होते. टॉस झाल्यावर कोहलीच्या चेहऱ्यावर स्मित फुलल्याचे पाहायला मिळाले. कारण यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच कोहलीने नाणेफेक जिंकली होती.
नाणेफेक जिंकल्यावर कोहली म्हणाला की, " यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच मी टॉस जिंकलो, त्यामुळे मी आनंदित आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये मला नाणेफेकीच्या कौलने हुलकावणी दिली होती. पण मोसमाच्या अखेरीस तरी मला टॉस जिंकता आला आहे."
Web Title: IPL 2019: Out or Not Out, You Make decision like The Third Umpire, Watch This Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.