मोहाली, आयपीएल २०१९ : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवात आश्वासक झाली नाही. बंगळुरुचा डाव आता कोसळणार असे वाटत असताना पार्थिव पटेलने संघाच्या डावाला आधार दिला. पटेलच्या अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरुला राजस्थानपुढे 159 धावांचे आव्हान ठेवता आले.
राजस्थानने नाणेफेक जिंकून बंगळुरुला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बंगळुरुला यावेळी ४९ धावांची सलामी मिळाली आणि त्यांना पहिला धक्का बसला तो विराट कोहलीच्या रुपात. श्रेयस गोपाळने अप्रतिम चेंडू टाकत कोहलीचा मिडल स्टम्प उडवला. कोहलीला २५ डूंत २३ धावा करता आल्या. कोहलीनंतर बंगळुरुने काही फरकाने दोन फलंदाज गमावले. पण या साऱ्या घडामोडी घडत असताना पटेल मात्र संघाची धावगती वाढवण्यासाठी प्रयत्नशील होता. पटेलने यावेळी २९ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. पटेलने ४१ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६७ धावा केल्या.