हर्षा भोगले लिहितात...आयपीएलचे अर्धे सत्र संपले आहे. यावेळी राजस्थान रॉयल्सवर नजर टाकल्यास जोस बटलरने धावा केल्या नाहीत, तर त्यांचा पुढचा प्रवास खुंटू शकतो, असा समज झाला असावा. मागच्यावर्षी हेच घडले. यंदा त्याच्या उपस्थितीत दोन सामने जिंकल्यानंतर तुमचे मत पूर्णपणे चुकीचे आहे, असे म्हणता येणार नाही.आतापर्यंत बटलरची एकच उणिव बाहेर आली. ती म्हणजे दुसऱ्या टोकावर उभा असताना तो क्रिझमधून वारंवार बाहेर पडतो.बटलर आता परत गेला आहे. त्यामुळे रॉयल्सचा हरविणे सोपे आहे, असाही समज झाला असेल. पण खेळात नेहमी असे घडते की एखादा महान खेळाडू बाहेर झाल्यास त्याच्या छायेत वावरणारा खेळाडू पुढे येतो. स्मिथ आणि रहाणे यांनी जबाबदारी ओळखली, श्रेयस गोपाल याने स्वत:ची कामगिरी सुधारली शिवाय काही प्रमाणात रियान पराग याने देखील लक्ष वेधले.पराग फारच शानदार खेळाडू आहे. तो आणखी मुरब्बी बनू शकतो. मी त्याच्याबाबत बनेल असे म्हणण्यापेक्षा बनू शकतो, असा शब्द वापरला. त्यामागील कारण योग्यता ही यशाचे संकेत देणारी ठरते. याच योग्यतेच्या बळावर त्याने भविष्याची झलक दाखविली. वेळेच्या मागणीनुसार फटकेबाजी करणारा आणि संयम बाळगणारा खेळाडू परागमध्ये पाहता येईल. परिस्थिती ओळखण्याच्या क्षमतेचा परिचय देत परागने चांगलेच प्रभावित केले. वयाने तो लहान असेल पण त्याचा खेळ मात्र परिपक्व खेळाडूसारखाच आहे.आता परागकडून अपेक्षा वाढतील, चाहते त्याच्याबाबत वेगळा विचार करू लागतील. कॅमेºयाच्या नजरा परागवर राहतील. चांगल्या गोष्टी घडू लागतात त्याचवेळी काही गोष्टी धोकादायक देखील होऊ लागतात. जेव्हा तुम्ही युवा असता, यश मिळत असते तेव्हा चेंडू फटकावताच तुमची योग्यता काय, याचा अंदाज येतो. पण परागबाबत बोलायचे तर त्याच्या यशामागे शॉट नसून तो स्वत: आहे. त्याच्या यशाला आणि क्षमतेला बळ देणारे चांगले कोच भारतीय क्रिकेटकडे नाहीत. माझ्या शुभेच्छा परागसोबत आहेत.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2019: 'पराग वयाने कमी, मात्र त्याचा खेळ परिपक्व'
IPL 2019: 'पराग वयाने कमी, मात्र त्याचा खेळ परिपक्व'
परिस्थिती ओळखण्याच्या क्षमतेचा परिचय देत परागने चांगलेच प्रभावित केले. वयाने तो लहान असेल पण त्याचा खेळ मात्र परिपक्व खेळाडूसारखाच आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 3:19 AM