नवी दिल्ली, आयपीएल २०१९ : फलंदाजांच्या आत्मघातकी फटक्यांमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबला प्रथम फलंदाजी 166 धावा करता आल्या. दिल्लीच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पंजाबच्या धावसंख्येला वेसण घातली.
दिल्लीने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. लोकेश राहुलच्या रुपात पंजाबला पहिला धक्का बसला. त्यानंतर सॅम कुरन आणि मयांक अगरवाल हे दोघे बाद झाल्याने पंजाबची ३ बाद ५८ अशी स्थिती झाली होती. पण त्यानंतर डेव्हिड मिलर आणि सर्फराझ खान यांनी संघाला डाव सावरला. सर्फराझने २९ चेंडूंत सहा चौकारांसह ३९ धावा केल्या. सर्फराझ बाद झाल्यावर मिलरने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. पण मोठा फटका मारण्याच्या नादात मिलर बाद झाला. मिलरने ३० चेंडूंच ४३ धावांची खेळी साकारली.