जयपूर, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सोमवारी झालेल्या किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना 'मांकड' नियमामुळे चांगलाच गाजत आहे. पंजाबचा कर्णधार आर अश्विन याने राजस्थानच्या जोस बटलरला मांकड नियमानुसार धावबाद केले. पण, त्यानंतर सोशल मीडियावर वाद सुरू झाला. अश्विनने सात वर्षांपूर्वीही फलंदाजाला असंच बाद केलं होतं.
श्रीलंकेविरुद्ध ब्रिस्बेन येथे झालेल्या कॉमनबेल्थ बँक वन डे सीरिजमधील सामन्यात अश्विनने लाहिरु थिरिमानेला मांकड नियमानुसार बाद केले होते. त्यावेळी संघातील सर्वात अनुभवी फलंदाज सचिन तेंडुलकर आणि प्रभारी कर्णधार वीरेंद्र सेहवाग यांनी खिलाडूवृत्ती दाखवताना थिरिमानेविरुद्धची अपील मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अश्विन संघातील कनिष्ठ सदस्य होता आणि त्याने नियमात राहून फलंदाजाला बाद केले होते. पण, वरिष्ठ खेळाडूंचे विचार वेगळे होते.