Join us  

 IPL 2019 : रैनाचे अर्धशतक, चेन्नईचे दिल्लीला 180 धावांचे आव्हान

रैनाने ३७ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५९ धावा केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 9:31 PM

Open in App

चेन्नई, आयपीएल २०१९ : सुरेश रैनाच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सला 179 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.

 

दिल्लीने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. चेन्नईच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. कारण सलामीवीर शेन वॉटसनला एकही धाव करता आली नाही. पण त्यानंतर सुरेश रैना आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी संघाला सावरले. सुरेश रैना आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी संयत फलंदाजी करत नवव्या षटकात संघाचे अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी रचली. फॅफच्या रुपात चेन्नईला दुसरा धक्का बसला. फॅफने ४१ चेंडूंत ३९ धावा केल्या. त्यानंतर सुरेश रैनाच्या रुपात चेन्नईला तिसरा धक्का बसला. रैनाने ३७ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५९ धावा केल्या.

पीचवर पडूनही रैनाने मारला चौकार दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील आजच्या सामन्यात एक वेगळाच किस्सा पाहायला मिळाला. या सामन्यात चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. त्यावेळी सुरेश रैनाने चक्क पीचवर पडून चौकार मारल्याचे पाहायला मिळाले.

अक्षर पटेलच्या सहाव्या षटकात ही गोष्ट पाहायला मिळाली. सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रैना एक फटका मारायला गेला. पण त्यावेळी त्याचा तोल योग्य न राहिल्यामुळे तो पीचवर पडला. पण त्याने जो फटका मारला तो थेट सीमारेषेवर गेला आणि रैनाला चौकार मिळाला.

पाहा हा व्हिडीओ

टॅग्स :सुरेश रैनाचेन्नई सुपर किंग्सआयपीएल 2019