Join us  

IPL 2019 : पंजाबचे राजस्थानपुढे 183 धावांचे आव्हान

लोकेश राहुलने 52 धावांची खेळी साकारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 9:43 PM

Open in App

मोहाली, आयपीएल 2019 : लोकेश राहुल आणि डेव्हिड मिलर यांच्या दमदार भागीदारीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबलाराजस्थान रॉयल्सपुढे 183 धावांचे आव्हान ठेवता आले.

राजस्थानने नाणेफेक जिंकत पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. सुरुवातीला ख्रिस गेल आणि त्यानंतर मयांक अगरवाल यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. गेलने 30 आणि मयांकने 26 धावा केल्या. गेल आणि मयांक हे दोघेही बाद झाल्यावर  लोकेश राहुल आणि डेव्हिड मिलर यांनी संघाची धावगती वाढवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. 

 

राहुलने यावेळी चौकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. राहुलने 45 चेंडूंत अर्धशतकाला गवसणी घातली. पण त्यानंतर राहुलला मोठी खेळी साकारता आली नाही. राहुल 52 धावांवर बाद झाला. या खेळीमध्ये त्याने तीन चौकार आणि दोन षटकार लगावले. डेव्हिड मिलरने 27 चेंडूंत 40 धावांची खेळी केली.

 

टॅग्स :किंग्ज इलेव्हन पंजाबराजस्थान रॉयल्स