Join us  

IPL 2019 : राजस्थान रॉयल्सला घरचा अहेर, बेन स्टोक्स काय म्हणाला ते वाचाच...

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात बेन स्टोक्सने संघाचे आव्हान जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 7:07 PM

Open in App

नवी दिल्ली, आयपीएल २०१९ : रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचा सामना राजस्थान रॉयल्सला जिंकता आला नाही. हा सामना जिंकण्यासाठी राजस्थानच्या बेन स्टोक्सने शर्थीचे प्रयत्न केले. पण अखेरच्या षटकामध्ये तो बाद झाला आणि राजस्थानच्या हातून सामना निसटला. या पराभवानंतर स्टोक्स निराश झाला असून त्याने राजस्थान रॉयल्सलाच घरचा अहेर दिला आहे.

चेन्नईच्या १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे शून्यावर बाद झाला. त्यानंतर राजस्थानने १४ धावांत अजून दोन फलंदाज गमावले. पण त्यानंतर राहुल त्रिपाठी (39) आणि स्टीव्हन स्मिथ (28) यांनी राजस्थानचा डाव सावरला. पण हे दोघे बाद झाल्यावर बेन स्टोक्सने संघाचे आव्हान जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या षटकामध्ये स्टोक्सच्या रुपात राजस्थानला मोठा धक्का बसला. स्टोक्सने २६ चेंडूंत ४६ धावा केल्या.

या सामन्यानंतर स्टोक्स म्हणाला की, " आतापर्यंत तिन्ही सामने आम्ही गमावले आहेत. पण तरीदेखील यामधून काही सकारात्मक गोष्ट मिळू शकते का, हे आम्ही पाहत आहोत. पण जर आम्ही ४-५ सामने गमावले तर स्पर्धेत पुनरागमन करणे राजस्थानला कठिण जाईल."

राजस्थानच्या तिन्ही सामन्यांवर नजर फिरवली तर त्यांनी या लढती जिंकता जिंकता गमावलेल्या आहेत. चेन्नईविरुद्धचा सामनाही त्यांना जिंकता आला असता, पण ऐनवेळी त्यांनी कच खाल्ली. आतापर्यंत तिन्ही सामने गमावल्यामुळे राजस्थानच्या संघाचे शून्य गुण आहेत.

महेंद्रसिंग धोनीची धडाकेबाज खेळी आणि गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने राजस्थानव रॉयल्सवर आठ धावांनी विजय मिळवला. धोनीच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नईचा 175 धावा उभारता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला 167 धावा करता आल्या. चेन्नईने सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. 

चेन्नईची चांगली सुरुवात झाली नसली तरी महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जचा डाव फक्त सावरला नाही, तर सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. धोनीच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नईचा 175 धावा उभारता आल्या. धोनीने ४६ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 75 धावा केल्या.

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकाराले आहे. त्यामुळे या सामन्यात चेन्नईला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. राजस्थानच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला. त्यामुळे चेन्नईचे तीन फलंदाज फक्त २७ धावांत बाद झाले. पण त्यानंतर मात्र धोनी आणि सुरेश रैना यांनी संघाला सावरले. रैनाने ३२ चेंडूंत ३६ धावा केल्या.

टॅग्स :बेन स्टोक्सराजस्थान रॉयल्सचेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनी