चेन्नई, आयपीएल 2019: रवींद्र जडेजा हा नेहमीच आपला लूक बदलत असतो. आतातर त्याने असा काही लूक केला आहे की, त्याच्या दाढीमध्ये नेमकं काय दडलंय, हा प्रश्न चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंनाही पडला आहे.
जडेजाने आपल्या दाढीला ब्राऊन कलर केला आहे. ही गोष्ट साधी असली तरी चेन्नईच्या खेळाडूंना मात्र यामध्ये काहीतरी विशेष वाटत आहे. त्यामुळेच शार्दुल ठाकूरही त्याची दाढी न्याहाळताना दिसत आहे. जडेजाच्या दाढीची चर्चा चेन्नईच्या संघात आहे. जडेजाच्या दाढीने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही भुरळ पाडली आहे. कारण एका व्हिडीओमध्ये धोनीने खास जडेजाबरोबर या लूकमध्ये फोटो काढला आहे. या दाढीबद्दल धोनीही जडेजाला काहीतरी विचारत असल्याचेही दिसत आहे.
हा पाहा खास व्हिडीओ
दिल तो बच्चा हैं जी... धोनीने केली मस्ती, पाहा हा व्हिडीओ
महेंद्रसिंग धोनी, हे नावच साऱ्यांसाठी पुरेसं आहे. कारण हाच धोनी अनहोनी को होनी, करणारा आहे. पण मैदानात मात्र धोनी शांत असतो. मैदानात आपल्या भावनांना तो वाट मोकळी करून देत नाही. पण शनिवारी चेन्नई सुपर किंग्सचाकिंग्ज इलेव्हन पंजाबबरोबर सामना होता. हा सामना चेन्नईने जिंकला. या सामन्यानंतर धोनीने मैदानात चक्क मस्ती केल्याचे पाहायला मिळाले.
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने तिनवेळा जेतेपद पटकावले आहे. धोनी ज्या खेळाडूंच्या सहवासात येतो त्यांच्या खेळात सकारात्मक बदल झाल्याचे पाहायला मिळते. मैदानात तो जेवढा गंभीर असतो, तेवढाच मैदानाबाहेर तो खेळाडूंबरोबर मस्ती करत असतो. पण यावेळी धोनीने खेळाडूंबरोबर मस्ती केली नाही, तर खेळाडूंच्या लहानग्यांबरोबर धोनी मस्ती करत असल्याचे पाहायला मिळाले.
पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर चेन्नईचे खेळाडू आणि त्यांची मुलं मैदानात होती. त्यावेळी शेन वॉटसन आणि इम्रान ताहिर यांची मुलं धमाल करत होती. या दोघांमध्ये धावण्याची शर्यत सुरु होणार होती. यावेळी धोनी त्यांच्या मागून आला आणि त्यांच्या आधीच धावत पुढे गेला. त्यानंतर या तिघांमध्ये धावण्याची शर्यत रंगली. या शर्यतीमध्ये वॉटसनचा मुलगा पुढे निघून गेला. त्यावेळी धोनीने ताहिरच्या मुलाला उचलून घेतले आणि ही शर्यत पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले.
Web Title: IPL 2019: ravindra jadeja's new look, see special video ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.