IPL 2019 : RCB च्या 'स्वीट सांबार' ट्विटला CSKचं गमतीशीर उत्तर

गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्याने इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 12 व्या हंगामाची सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 01:00 PM2019-02-20T13:00:59+5:302019-02-20T13:01:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: RCB and CSK engage in a Twitter banter after the schedule announcement | IPL 2019 : RCB च्या 'स्वीट सांबार' ट्विटला CSKचं गमतीशीर उत्तर

IPL 2019 : RCB च्या 'स्वीट सांबार' ट्विटला CSKचं गमतीशीर उत्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्याने इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 12 व्या हंगामाची सुरुवात होणार आहे. गतवर्षी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आयपीएलमध्ये पुनरागमन करताना जेतेपदाला गवसणी घातली होती. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमनवर चेन्नईने 2018 मध्ये अंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघाला नमवून तिसरे जेतेपद पटकावले होते.

यंदाही चेन्नईच जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात कॅप्टन कूल धोनी आणि विराट कोहली यांच्यातील चुरस पाहायला मिळणार आहे. दक्षिणेकडील दोन्ही संघांत बाजी कोण मारेल, याची उत्सुकता आतापासूनच लागलेली आहे. लोकसभा निवडणुक लक्षात घेता आयपीएलच्या पहिल्या दोन आठवड्यांचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मंगळवारी 17 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आणि त्यात मुंबई इंडियन्सच्या वाट्याला चार सामने आले आहेत. आठही संघांना घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणार आहे. 

23 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीतील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 5 एप्रिलला बंगळुरू कोलकाता नाईट रायडर्सचा सामना करणार आहे. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर केलेले ट्विट सध्या चांगलेच गाजत आहे. त्यांनी लिहिले की,''दक्षिण भारत डर्बीचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज. पण, आम्हाला स्वीट सांबार आवडतो.'' 



तीन वेळा जेतेपदाची माळ गळ्यात घालणाऱ्या चेन्नईने RCBच्या त्या ट्विटला मजेशीर रिप्लाय दिला. चेन्नई आणि बंगळुरू यांच्यातील आतापर्यंतच्या सामन्यात 22 पैकी 14 विजय हे धोनीच्या संघाने मिळवले आहेत. 2018 मध्ये धोनीच्या संघाने बंगळुरूला घरच्या आणि त्यांच्या मैदानावर पराभवाची चव चाखवली आहे. त्यामुळे बंगळुरूच्या स्वीट सांबार ट्विटवर चेन्नईने लिहिले की,''सांबार हे नेहमी पिवळ्या रंगाचे असते ना?'' 


मे-जून मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेमुळे आयपीएल यंदा मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. 23 मार्च पासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली होती. आयपीएल दरम्यान भारतामध्ये निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आयपीएलचे सामना भारतात होणार की नाही याबाबत साशंकता होती. सध्याच्या सरकारचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार आहे आणि त्यानंतर निवडणूक होतील. 30 मे ते 14 जून या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धाही होणार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्याची तारेवरची कसरत बीसीसीआयला करावी लागणार आहे. त्यामुळे पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

Web Title: IPL 2019: RCB and CSK engage in a Twitter banter after the schedule announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.