IPL 2019 RCB vs CSK : धोनीची झुंज व्यर्थ; आरसीबीचा शेवटच्या चेंडूवर विजय

शेवटच्या चेंडूवर आरबीसीचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 07:30 PM2019-04-21T19:30:10+5:302019-04-22T00:35:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 RCB vs CSK : धोनीची झुंज व्यर्थ; आरसीबीचा शेवटच्या चेंडूवर विजय | IPL 2019 RCB vs CSK : धोनीची झुंज व्यर्थ; आरसीबीचा शेवटच्या चेंडूवर विजय

IPL 2019 RCB vs CSK : धोनीची झुंज व्यर्थ; आरसीबीचा शेवटच्या चेंडूवर विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरू, आयपीएल 2019 : अटीतटीच्या लढतीत बंगळुरूनं चेन्नईवर अवघ्या एका धावेनं विजय मिळवला. बंगळुरुनं प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 161 धावा केल्या. यानंतर चेन्नईनं पहिले चार फलंदाज लवकर गमावले. पण त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अंबाती रायुडूनं डाव सावरला. रायुडू बाद झाल्यानंतर एका बाजूनं फलंदाज बाद होत राहिले. मात्र धोनीनं फटकेबाजी करत आव्हान जिवंत ठेवलं. शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या असताना शार्दुल ठाकूर धावबाद झाला आणि चेन्नईला पराभव पत्करावा लागला.

 

11:51 PM

बंगळुरू एका रननं विजयी

11:38 PM

18 व्या षटकानंतर चेन्नई 6 बाद 126

11:30 PM

चेन्नईला सहावा धक्का; जाडेजा धावबाद

11:28 PM

16 षटकांनंतर चेन्नई 5 बाद 105

11:21 PM

15 व्या षटकानंतर चेन्नई 5 बाद 92; विजयासाठी 70 धावांची गरज

11:15 PM

चेन्नईला मोठा धक्का; रायुडू बाद

10:54 PM

चेन्नईच्या 10 षटकांत 4 बाद 57 धावा



 

10:45 PM

विराट कोहलीनं चेन्नईच्या अंबाती रायुडूला जीवदान दिले. 9व्या षटकात चोरटी धाव घेणाऱ्या रायुडूला धावबाद करण्याची सोपी संधी कोहलीनं दवडली,



 

10:36 PM

सुरेश रैनाचा त्रिफळा कसा उडाला, Video

https://www.iplt20.com/video/176827

10:34 PM

2013च्या अंतिम सामन्यानंतर सुरेश रैना आयपीएलमध्ये प्रथमच शून्यावर बाद झाला आहे. 

10:30 PM

यादवने बंगळुरूला आणखी एक यश मिळवून दिले. त्याने केदार जाधवला ( 9) एबी डिव्हिलियर्सकरवी झेलबाद केले.

10:19 PM



 

10:12 PM



 

10:02 PM

प्रत्युत्तरात चेन्नईला पहिल्याच षटकात धक्का बसला. डेल स्टेनने पाचव्या चेंडूवर चेन्नईच्या शेन वॉटसनला बाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर अप्रतिम यॉर्कर टाकून सुरेश रैनाचा त्याने त्रिफळा उडवला.

09:53 PM



 

09:52 PM



 

09:51 PM

फॅफ ड्यू प्लेसिसचा स्पायडरमॅन झेप पाहिलात का?

https://www.iplt20.com/video/176754

09:32 PM



 

09:18 PM

पटेलने 36 चेंडूंत अर्धशतक झळकावले. पण, पुढच्याच चेंडूवर ब्राव्होने त्याला माघारी पाठवले. शेन वॉटसनने त्याचा झेल टिपला. पटेलने 37 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकारांसह 53 धावा केल्या. 
 

09:02 PM



 

09:01 PM

पटेलने अक्षदीप नाथला सोबत घेत बंगळुरूची धावसंख्या हलती ठेवली. दोघांनी धावांचा वेग कायम राखण्यात यश मिळवले. पण, पुन्हा जडेजा व ड्यू प्लेसिस या जोडीनं बंगळुरूला धक्का दिला. जडेजाच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात नाथ (24) बाद झाला. 

08:53 PM

#IPL2019 ABDने चेंडू टोलावला तेव्हाच त्याला कळले...

IPL 2019 RCB vsCSK : फॅफकाठावरपास, तरABD नापास, पाहाअफलातूनझेलhttps://t.co/UUyjopybfd@RCBTweets@ChennaiIPL#RCBvCSK@IPL#fafduplessis#ABDevilliers

— Lokmat(@MiLOKMAT) April 21, 2019  

08:36 PM



 

08:35 PM

सातव्या षटकात धोनीनं रवींद्र जडेजाला पाचारण केले. पटेलने खणखणीत षटकाराने जडेजाचे स्वागत केले. मात्र, पाचव्या षटकात जडेजाने बंगळुरूला मोठा धक्का दिला. त्याच्या गोलंदाजीवर डिव्हिलियर्सने उत्तुंग फटका मारला, परंतु फॅफ ड्यु प्लेसिसने अगदी सीमारेषेनजीक सुरेख झेल टिपला. 19 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार खेचून डिव्हिलियर्स माघारी परतला. 

08:30 PM

विराट कोहली असा अडकला धोनीच्या चक्रव्युहात... Video

https://www.iplt20.com/video/176452

08:29 PM

डिव्हिलियर्ससोबत सलामीवीर पटेलही अधूनमधून चेन्नईच्या गोलंदाजांवर हात साफ करत होता. बंगळुरूने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 49 धावा केल्या. 
 

08:27 PM

 एबी डिव्हिलियर्सने या सामन्यातून पुनरागमन केले. आयपीएलमधील त्याचा हा 150 वा सामना ठरला आणि हा पल्ला गाठणारा तो पहिलाच परदेशी खेळाडू आहे. त्याने बंगळुरूचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डिव्हिलियर्सने टोलावलेला चेंडू फॅफ ड्यु प्लेसिसने टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश आले नाही. त्याच्या या प्रयत्नावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. 

08:14 PM

08:13 PM

चेन्नईने नाणेफेक जिंकून यजमान बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सावध सुरुवातीनंतर विराट कोहली आणि पार्थिव पटेल ही जोडी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चक्रव्युहात अडकली. सामन्याच्या तिसऱ्याच षटकात दीपक चहरने चेन्नईला पहिले यश मिळवून देताना कोहलीला यष्टिरक्षक धोनीकरवी झेलबाद केले. कोहली 9 धावांवर माघारी परतला. 

08:05 PM



 

08:01 PM

एबी डिव्हिलियर्सचा हा 150 वा आयपीएल सामना आहे. हा पल्ला गाठणारा तो पहिलाच परदेशी खेळाडू ठरला आहे. 

07:40 PM



 

07:39 PM



 

07:33 PM

रॉयल चॅलेंजर्स संघात एबी डिव्हिलियर्स परतला, तर चेन्नई सुपर किंग्सच्या संघात ड्वेन ब्राव्होचे पुनरागमन

Web Title: IPL 2019 RCB vs CSK : धोनीची झुंज व्यर्थ; आरसीबीचा शेवटच्या चेंडूवर विजय

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.