बंगळुरू, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 7 बाद 161 धावा केल्या. पार्थिव पटेलच्या अर्धशतकी खेळीनं बंगळुरूला समाधानकारक पल्ला गाठून देण्यात हातभार लावला.
चेन्नईने नाणेफेक जिंकून यजमान बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सावध सुरुवातीनंतर विराट कोहली आणि पार्थिव पटेल ही जोडी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चक्रव्युहात अडकली. सामन्याच्या तिसऱ्याच षटकात दीपक चहरने चेन्नईला पहिले यश मिळवून देताना कोहलीला यष्टिरक्षक धोनीकरवी झेलबाद केले. कोहली 9 धावांवर माघारी परतला. एबी डिव्हिलियर्सने या सामन्यातून पुनरागमन केले. आयपीएलमधील त्याचा हा 150 वा सामना ठरला आणि हा पल्ला गाठणारा तो पहिलाच परदेशी खेळाडू आहे. त्याने बंगळुरूचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डिव्हिलियर्सने टोलावलेला चेंडू फॅफ ड्यु प्लेसिसने टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश आले नाही. त्याच्या या प्रयत्नावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. डिव्हिलियर्ससोबत सलामीवीर पटेलही अधूनमधून चेन्नईच्या गोलंदाजांवर हात साफ करत होता. बंगळुरूने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 49 धावा केल्या.
सातव्या षटकात धोनीनं रवींद्र जडेजाला पाचारण केले. पटेलने खणखणीत षटकाराने जडेजाचे स्वागत केले. मात्र, पाचव्या षटकात जडेजाने बंगळुरूला मोठा धक्का दिला. त्याच्या गोलंदाजीवर डिव्हिलियर्सने उत्तुंग फटका मारला, परंतु फॅफ ड्यु प्लेसिसने अगदी सीमारेषेनजीक सुरेख झेल टिपला. 19 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार खेचून डिव्हिलियर्स माघारी परतला.
पटेलने अक्षदीप नाथला सोबत घेत बंगळुरूची धावसंख्या हलती ठेवली. दोघांनी धावांचा वेग कायम राखण्यात यश मिळवले. पण, पुन्हा जडेजा व ड्यू प्लेसिस या जोडीनं बंगळुरूला धक्का दिला. जडेजाच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात नाथ (24) बाद झाला. पंधरा षटकांत बंगळुरूने 3 बाद 118 धावा केल्या होत्या. पटेलने 36 चेंडूंत अर्धशतक झळकावले. पण, पुढच्याच चेंडूवर ब्राव्होने त्याला माघारी पाठवले. शेन वॉटसनने त्याचा झेल टिपला. पटेलने 37 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकारांसह 53 धावा केल्या. त्यापाठोपाठ पुढील षटकात स्टॉइनिसही बाद झाला. ड्यू प्लेसिसचा प्रसंगावधान पाहून चेन्नईचे चाहते खूश झाले. सीमारेषेबाहेर तोल जात असल्याचे लक्षात येतान ड्यू प्लेलिसने चेंडू स्टीफन्सनच्या दिशेने फेकला आणि स्टॉइनिसला झेलबाद करून माघारी पाठवले. त्यानंत मोईन अलीनं खिंड लढवली.
IPL 2019 RCB vsCSK : OMG.... मार्कसस्टॉइनिसथोडक्यातवाचला, पटेलच्याकाळजाचाठोकाचुकलाhttps://t.co/5dXwlClSJZ@RCBTweets@ChennaiIPL@IPL#RCBvCSK
— Lokmat(@MiLOKMAT) April 21, 2019 Web Title: IPL 2019 RCB vs CSK: Royal Challengers Bangalore set 162 runs target to Chennai Super Kings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.