RCB vs CSK: पार्थिवचा थ्रो अचूक लागला अन् कोहलीनं सुटकेचा निश्वास टाकला

पार्थिवच्या अचूक थ्रोमुळे बंगळुरूचा अटीतटीच्या लढतीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 12:32 AM2019-04-22T00:32:19+5:302019-04-22T00:50:16+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 rcb vs csk virat kohlis team wins last ball thriller after parthiv patels accurate throw hits stump | RCB vs CSK: पार्थिवचा थ्रो अचूक लागला अन् कोहलीनं सुटकेचा निश्वास टाकला

RCB vs CSK: पार्थिवचा थ्रो अचूक लागला अन् कोहलीनं सुटकेचा निश्वास टाकला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरू: अखेरच्या षटकात विजयासाठी 26 धावांची गरज असताना महेंद्रसिंग धोनीने अनुभव पणाला लावला. त्याने तीन षटकार, 1 चौकार आणि 2 धावा घेत सामन्यात थरार आणला. 1 चेंडू दोन धावा आवश्यक असताना धोनीचा फटका हुकला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या पार्थिव पटेलने योग्य वेळी अचूक निशाणा साधला. पटेलच्या त्या एका थ्रोने नर्व्हस कॅप्टन विराट कोहलीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले... पाहा तो क्षण..

https://www.iplt20.com/video/177100/the-run-out-that-got-msd-furious?tagNames=feature,indian-premier-league

डेल स्टेन आणि उमेश यादव यांनी सुरुवातीलाच दिलेल्या धक्क्यातून चेन्नई सुपर किंग्सला महेंद्रसिंग धोनीने सावरले. धोनीने आतषबाजी करताना थरारक सामन्यात चेन्नईला विजया नजीक आणले,  परंतु अवघ्या एका धावेने त्यांचा विजय हुकला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने हा सामना १ धावेने जिंकून प्ले ऑफच्या आशा अजून जीवंत राखल्या आहेत. चेन्नईला प्ले ऑफमधील प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. महेंद्रसिंग धोनीने अखेरपर्यंत संघर्ष केला,परंतु चेन्नईला विजय मिळवून देण्यासाठी तो पुरेसा ठरला नाही. धोनीने 84 धावांची खेळी केली. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध  7 बाद 161 धावा केल्या. पार्थिव पटेलच्या अर्धशतकी खेळीनं बंगळुरूला समाधानकारक पल्ला गाठून देण्यात हातभार लावला. कर्णधार विराट कोहली स्वस्तात माघारी परतल्यानंतर पटेलने बंगळुरूसाठी खिंड लढवली. त्याने 37 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकार खेचून 53 धावा केल्या. त्याला एबी डिव्हिलियर्स ( 25), अक्षदीप नाथ ( 24) आणि मोइन अली ( 26) यांची साथ मिळाली. चेन्नईकडून दीपक चहर, रवींद्र जडेजा आणि ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. 



प्रत्युत्तरात चेन्नईला पहिल्याच षटकात धक्का बसला. डेल स्टेनने पाचव्या चेंडूवर चेन्नईच्या शेन वॉटसनला बाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर अप्रतिम यॉर्कर टाकून सुरेश रैनाचा त्याने त्रिफळा उडवला. चौथ्या षटकात फॅफला नशिबाची साथ मिळाली. उमेश यादवने टाकलेला चेंडू यष्टींना चाटून गेला, परंतु बेल्स न पडल्याने फॅफला माघारी जावे लागले नाही. पण, त्याच षटकात यादवने त्याला बाद केले. ड्यू प्लेसिस 5 धावांवर माघारी परतला. 


यादवने बंगळुरूला आणखी एक यश मिळवून दिले. त्याने केदार जाधवला ( 9) एबी डिव्हिलियर्सकरवी झेलबाद केले. पॉवर प्लेमध्ये चेन्नईची अवस्था 4 बाद 32 धावा अशी दयनीय झाली होती. 2013च्या अंतिम सामन्यानंतर सुरेश रैना आयपीएलमध्ये प्रथमच शून्यावर बाद झाला आहे. महेंद्रसिंग धोनी व रायुडू यांन संयमी खेळी करताना चेन्नईला आणखी धक्के बसण्यापासून वाचवले. विराट कोहलीनं चेन्नईच्या अंबाती रायुडूला जीवदान दिले. 9व्या षटकात चोरटी धाव घेणाऱ्या रायुडूला धावबाद करण्याची सोपी संधी कोहलीनं दवडली.  12व्या षटकात युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर रायुडू यष्टिचीत असल्याचे दिसत होते, परंतु तिसऱ्या पंचांनी त्याला नाबाद ठरवल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. 

रायुडू आणि धोनी या जोडीने अर्धशतकी भागीदारी करून चेन्नईचा संघर्ष कायम राखला. पण चहलने रायुडूला त्रिफळाचीत केले. रायुडूने 29 धावा केल्या. रवींद्र जडेजाही फार काही करू शकला नाही. धोनी एका बाजूने संघर्ष करत होता. त्याने 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पण त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. चेन्नईला 8 बाद 160 धावा करता आल्या.

 

Web Title: IPL 2019 rcb vs csk virat kohlis team wins last ball thriller after parthiv patels accurate throw hits stump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.