IPL 2019 RCB vs DC : रॉयल चॅलेंजर बंगळुरू पुन्हा विजयापासून वंचित

बंगळुरू, आयपीएल 2019 : श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ या मुंबईकर खेळाडूंनी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 03:24 PM2019-04-07T15:24:33+5:302019-04-07T19:28:18+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 RCB vs DC : रॉयल चॅलेंजर बंगळुरू पुन्हा विजयापासून वंचित | IPL 2019 RCB vs DC : रॉयल चॅलेंजर बंगळुरू पुन्हा विजयापासून वंचित

IPL 2019 RCB vs DC : रॉयल चॅलेंजर बंगळुरू पुन्हा विजयापासून वंचित

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरू, आयपीएल 2019 : श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ या मुंबईकर खेळाडूंनी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये विराट कोहलीच्यारॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे बारा वाजवले. या जोडीने दमदार फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सला 4 विकेट राखून विजय मिळवून दिला. बंगळुरूचा हा सलग सहावा पराभव ठरल्याने प्ले ऑफ मध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा मार्ग अधिक खडतर झाला आहे. 149 धावांचा पाठलाग करताना पृथ्वीने 28, तर अय्यरने 67 धावांची खेळी केली. 

07:25 PM



 

06:54 PM

अय्यरने 37 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमधली त्याचे 11 वे अर्धशतक ठरले. 


06:51 PM

14व्या षटकात दिल्लीला आणखी एक धक्का बसला. इंग्राम 22 धावांवर मोइन अलीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.

06:40 PM

श्रेयस अय्यरला जीवदान. पवन नेगीने टाकलेल्या 11 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अय्यरचा झेल पार्थिव पटेलने सोडला.

06:36 PM

पवन नेगीने बंगळुरूला यश मिळवून दिले. त्याने पृथ्वीला बाद केले. पृथ्वीन 22 चेंडूंत 28 धावा केल्या. 

06:22 PM

 पृथ्वी आणि श्रेयस अय्यर यांनी दिल्लीच्या डावाला आकार दिला आणि त्यामुळे दिल्लीने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 53 धावांपर्यंत मजल मारली. 
 

06:14 PM

सैनीचा अफलातून झेल



 

06:09 PM

बंगळुरूला पहिल्याच षटकात यश मिळवून देणाऱ्या साउदीला मात्र तिसऱ्या षटकात पृथ्वी शॉने बदडवले. साउदीला त्याने सलग पाच चेंडूंत चौकार ठोकले. पाचवा चौकार हा पंचांनी लेग बाय दिला. 



 

06:01 PM

लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला पहिल्याच षटकात धक्का बसला. टीम साउदीने दुसऱ्याच चेंडूवर शिखर धवनला बाद केले. अखेरच्या चेंडूवर श्रेयस अय्यरचा झेल यष्टिरक्षक पार्थिव पटेलने सोडला. 

05:27 PM

कागिसो रबाडाने एकाच षटकात बंगळुरूच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले. कोहलीनंतर त्याच षटकात तिसऱ्या चेंडूवर अक्षदीप नाथही ( 19) माघारी परतला. अखेरच्या चेंडूवर पवन नेगीही बाद झाला. 

05:23 PM

पण, पुढच्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर तो कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरच्या हातात झेल देऊन माघारी परतला. कोहलीने 33 चेंडूंत 41 धावा केल्या. त्यात 1 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. 
 

05:20 PM

कोहली एका बाजूनं संयमी खेळी करून विकेट टिकवून होता. त्यामुळे त्याच्याकडून अखेरच्या षटकांत चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित होती आणि त्याने 17 व्या षटकात त्याचा ट्रेलर दाखवला. संदीपच्या त्या षटकात कोहलीनं 19 धावा चोपल्या. 

05:18 PM

संदीपची ही ट्वेंटी-20 सामन्यांतील 50वी विकेट ठरली. 18 वर्षीय संदीपने 40 सामन्यांत 19.46 च्या सरासरीने 50 विकेट घेतल्या आहेत. याच सामन्यात अक्षर पटेलनेही विकेटचे शतक पूर्ण केले. 

05:12 PM

अलीने 15व्या षटकात संदीप लामिचानेच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचून बंगळुरूला शतकी वेस ओलांडून दिली. पण, पुन्हा पुढे जाऊन फटका मारण्याचा मोह त्याला आवरता आला नाही आणि रिषभ पंतने त्याला यष्टिचीत केले. अलीने 18 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 32 धावा केल्या. 
 

05:08 PM

14व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अलीने डीप पॉईंटच्या दिशेने चेंडू मारला आणि दोन धाव घेतल्या. दुसरी धाव घेत असताना रिषभ पंतने अलीला धावबाद करण्यासाठी महेंद्रसिंग धोनीच्या स्टाइलची कॉपी केली. पण, त्याचा चेंडू स्टम्पच्या जळपासही जाऊ शकला नाही. इशांत शर्माच्या त्या षटकात बंगळुरूने 14 धावा काढल्या

05:00 PM



 

04:53 PM

 11व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर अक्षर पटेलने ही जोडी फोडली. त्याने स्टॉइनिसला 15 धावांवर माघारी पाठवले. 
 

04:50 PM

सलग पाच सामन्यांची पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची सुरुवात फार चांगली झाली नाही. पण, कोहली व मार्कस स्टॉइनिसने संयमी खेळ केला. या दोघांनी पहिल्या 10 षटकांत 2 बाद 64 धावांपर्यंत संघाला मजल मारून दिली. 

04:34 PM

डिव्हिलियर्सने 16 चेंडूंत 1 चौकार व 1 षटकारासह 17 धावा केल्या. कॉलीन इंग्रामने त्याचा अप्रतिम झेल घेतला. 

04:31 PM

पटेल माघारी परतल्यानंतर कोहली व एबी डिव्हिलियर्स यांनी बंगळुरूच्या डावाला आकार दिला. या दोघांना मोठे फटके मारण्यापासून दिल्लीच्या गोलंदाजांनी रोखले आणि त्यामुळेच बंगळुरूला पॉवर प्लेमध्ये 2 बाद 40 धावा करता आल्या. सहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कागिसो रबाडाने डिव्हिलियर्सला माघारी पाठवले. 

04:11 PM

पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीला मिळालेल्या जीवदानानंतर त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पार्थिव पटेलला बाद करून ख्रिस मॉरिसने दिल्लीला पहिले यश मिळवून दिले. मॉरिसने 9 चेंडूंत 9 धावा केल्या. 

04:08 PM

ख्रिस मॉरिसच्या पहिल्याच चेंडूवर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला जीवदान मिळाले. मॉरिसने टाकलेला चेंडू तिसऱ्या स्लीपमधून मारण्याचा कोहलीनं प्रयत्न केला, परंतु तेथे उभ्या असलेल्या शिखर धवनच्या हातातून झेल सुटला.

03:39 PM

नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या पारड्यात, बंगळुरूला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण



 

03:38 PM



 

03:37 PM

दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कॉलीन इंग्राम, राहुल तेवाटीया, ख्रिस मॉरिस, अक्षर पटेल, कागिसो रबाडा, इशांत शर्मा

03:36 PM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : पार्थिव पटेल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, मार्कस स्टॉइनिस, मोइन अली, अक्षदीप नाथ, पवन नेगी, टीम साउदी, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज

Web Title: IPL 2019 RCB vs DC : रॉयल चॅलेंजर बंगळुरू पुन्हा विजयापासून वंचित

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.