जयपूर, आयपीएल २०१९ : राजस्थान रॉयल्सने आपल्या चौथ्या सामन्यात अखेर पहिल विजय मिळवला. भेदक गोलंदाजी आणि जोस बटलरच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानने बंगळुरुवर विजय मिळवला. बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा केल्या. या आव्हानाचा सहजपणे यशस्वी पाठलाग राजस्थानने केला. राजस्थानने हा सामना सात विकेट्स राखून जिंकला.
11:24 PM
राजस्थानला तिसरा धक्का
स्टीव्हन स्मिथच्या रुपात राजस्थानला पहिला धक्का बसला. स्मिथने ३८ धावा केल्या.
11:18 PM
राजस्थानचे दीडशतक
राजस्थानने अठराव्या षटकात आपले दीडशतक पूर्ण केले.
10:53 PM
राजस्थानला दुसरा धक्का
जोस बटलरच्या रुपात राजस्थानला दुसरा धक्का बसला. बटलरने ४३ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५९ धावा केल्या.
10:45 PM
चौकारासर बटलरचे शतक
बटलरने चौकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. या मैदानातील बटलरचे हे चौथे अर्धशतक ठरले.
10:34 PM
अजिंक्य रहाणे आऊट
अजिंक्यच्या रुपात राजस्थानला पहिला धक्का बसला. अजिंक्यने २० चेंडूंत २२ धावा केल्या.
10:14 PM
राजस्थान ५ षटकांत बिनबाद ४६
राजस्थानच्या सलामीवीरांनी दमदार फलंदाजी केली. त्यामुळे राजस्थानला पाच षटकांमध्ये एकही फलंदाज न गमावता ४६ धावा करता आल्या.
10:01 PM
कोहलीने सोडला रहाणेचा झेल
राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे फक्त एका धावेवर असताना त्याला बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने जीवदान दिले.
09:36 PM
बंगळुरुचे राजस्थानपुढे १५९ धावांचे आव्हान
अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या दमदार फटकेबाजीमुळे बंगळुरुला १५८ धावा करता आल्या. बंगळुरुच्या धावसंख्येमध्ये महत्वाचे योगदान राहीले ते पार्थिव पटेलचे.
09:22 PM
पटेलची झुंजार खेळी संपुष्टात
पार्थिव पटेलने ४१ चेंडूंत ६७ धावांची दमदार खेळी साकारली.
09:09 PM
पार्थिवचे दमदार अर्धशतक
महत्वाचे फलंदाज बाद झाल्यावर बंगळुरुचा डाव पार्थिव पटेलने सावरला. पटेलने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
08:46 PM
शिमरॉन हेटमायर बाद, गोपालची तिसरी विकेट
08:36 PM
विराटपाठोपाठ डिव्हिलियर्सही बाद, बंगळुरूला दुसरा धक्का
08:25 PM
कोहली आऊट, बंगळुरुला मोठा धक्का
विराट कोहलीच्या रुपात बंगळुरुला पहिला धक्का बसला. कोहलीने २५ चेंडूंत २३ धावा केल्या.
08:24 PM
बंगळुरुची दमदार सुरुवात
बंगळुरुने राजस्थानविरुद्ध दमदार सुरुवात केली. बंगळुरुने पहिल्या सहा षटकांमध्ये एकही फलंदाज न गमावता ४८ धावा केल्या.
07:58 PM
कोहली शंभराव्यांदा बंगळुरुचे नेतृत्व करणार
आजच्या सामन्यात विराट कोहली शंभराव्यांदा बंगळुरुचे नेतृत्व करणार आहे.
07:39 PM
राजस्थानने नाणेफेक जिंकली
राजस्थानने नाणेफेक जिंकत बंगळुरुला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.
07:32 PM
पहिला विजय कोणाचा ठरणार...
बंगळुरु आणि राजस्थान या दोन्ही संघांना आतापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही. जो संघ आज सामना जिंकेल त्यांचा हा पहिला विजय ठरेल.
Web Title: Ipl 2019 RCB vs RR: राजस्थानचा बंगळुरुवर सात विकेट्स राखून विजय
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.