मुंबई : रिकी पॉन्टिंग आणि शेन वॉर्न हे एकाच संघातून खेळले होते. दोघांमध्ये चांगली मैत्रीही होती. पण आता वॉर्नने असे एक विधान केले आहे की, पॉन्टिंग आयपीएलमधून बाहेर पडू शकतो.
पॉन्टिंग हा आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक होता. आता तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. पण वॉर्नने एक वक्तव्य करून पॉन्टिंगची विकेट काढली आहे. आता बीसीसीआय यावर काय निर्णय घेते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
बीसीसीआयने आतापर्यंत परस्पर हितसंबंध जपण्याला विरोध केला आहे. त्यामुळेच भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शात्री हे आयपीएलमध्ये समालोचन करताना दिसत नाही. पॉन्टिंगची अशीच एक गोष्ट वॉर्नने सर्वांसमोर आणली आहे.
वॉर्न म्हणाला की, " पॉन्टिंग हा सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाचा सहाय्यक प्रशिक्षक आहे. त्यामुळे पॉन्टिंग हा दिल्लीच्या संघाचा प्रशिक्षक होऊ शकत नाही. हे परस्पर हितसंबंध जपण्यासारखे आहे."
लोकसभा निवडणुकींच्या तारखेनंतर आयपीएलचे वेळापत्रक ठरणार
देशात लोकसभा निवडणूकांची धुम सुरु आहे. पण यावेळीच देशात इंडियन प्रीमिअर लीगही (आयपीएल) रंगणार आहे. हे दोन्ही महासोहळे एकाचवेळी जर भारतात झाले तर सुरक्षायंत्रणेवर अतिरीक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे सर्वांचा नजरा आयपीएलच्या वेळापत्रकावर लागलेल्या आहेत. 4 फेब्रुवारीला आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा होणे अपेक्षित होते, परंतु आता नव्या माहितीनुसार लोकसभा निडवणुकीच्या तारखा ठरल्यानंतरच आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आहे.
मे-जून मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेमुळे आयपीएल यंदा मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. 23 मार्च पासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार असल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) केली होती. आयपीएलच्यावेळी भारतामध्ये निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आयपीएलचे सामना भारतात होणार की नाही याबाबत साशंकता होती. पण बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी आयपीएलचे सर्व सामने भारतातच होतील, असे मत व्यक्त केले होते. पण, त्यावेळी त्यांनी वेळापत्रक जाहीर केले नव्हते.
Web Title: IPL 2019: Ricky Ponting may be out of IPL; Shane Warne removed his wicket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.